Aishwarya Narkar Answers To His Fan : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेत्रीने त्यांच्या अभिनय व सौंदर्याने ९० चं दशक गाजवलं. त्या काळातील त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. आपल्या हटके अभिनयानं त्या सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसतात.
टेलिव्हिजन क्षेत्रातही त्या फार सक्रिय आहेत. सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आणखी वाचा – बॉटलमध्ये लघवी करायचा सुप्रसिद्ध अभिनेता, सेटवरील विचित्र वागणूकीमुळे इतरांनाही त्रास, खळबळजनक आरोप अन्…
सोशल मीडियावर ऐश्वर्या व त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांचे रिल्स व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओमुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण ऐश्वर्या ट्रोलर्सना न जुमानता अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. चाहत्यांशी ऐश्वर्या नेहमीच संपर्कात असतात. बरेचदा त्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ‘आस्क मी एनिथिंग’च सेशन घ्यायच्या. अशातच नुकत्याच घेतलेल्या सेशनमध्ये चाहत्यांनी ऐश्वर्या नारकरांना भरभरुन प्रश्न विचारले. कोणी त्यांना कामाविषयी विचारलं, तर कोणी त्यांना वैयक्तिक आवडी-निवडीविषयी विचारलं.
आणखी वाचा – “हिंदू आपल्याच देशात मान्यता मागतोय”, विक्रांत मॅसीच्या विधानावर नेटकऱ्यांनी फटकारलं, म्हणाले, “देशद्रोही…”
यादरम्यान एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना थेट डिनरसाठी विचारलं. चाहता म्हणाला, “मला एकदा तुमच्याबरोबर डिनर करायचा आहे. तारीख सांगा”. यावर अभिनेत्रीने जबरदस्त उत्तर दिलं. त्यांनी अशी तारीख सांगितली, जी अस्तित्वाच नसते. ३० फेब्रुवारी २०२५ ही तारीख ऐश्वर्या नारकरांनी उत्तर देत सांगितली. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या नारकरांच्या एका चाहत्याने त्यांना थेट “त्यांचं वजन किती आहे?”, असं विचारलं. यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिलं. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “समाजात भारी वजन”, त्यानंतर हसण्याचा इमोजी दिला आहे.