रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’मधील अक्षराचा लूकच बदलला, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन स्टाइल पेंडंटला अधिक पसंती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2024 | 12:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akshara Mangalsutra Design

'तुला शिकवीन…'मधील अक्षराचा लूकच बदलला, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन स्टाइल पेंडंटला अधिक पसंती

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक पसंती देताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या आगळ्यावेगळ्या कथानकानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील अक्षरा व अधिपतीच्या जोडीवर ही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अखेर अक्षरा व अधिपती यांनी प्रेमाची कबुली दिलेली मालिकेत पाहायला मिळत आहे त्यामुळे या मालिकेला पाहणं प्रेक्षकांना खूपच रंजक व उत्सुकतेच ठरत आहे. अधिपती व अक्षरा अखेर एकत्र आले असले तरी भुवनेश्वरी तिचे नवनवीन डाव आखतच आहे पण या सगळ्याला अक्षरा व अधिपती यांचे प्रेम कसे उत्तर देणार हे सुद्धा पाहणं मालिकेत रंजक ठरत आहे. (Akshara Mangalsutra Design)

मालिकेत अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे महत्त्वपूर्ण भूमिकेतप पाहायला मिळत आहे. शिवानीने याआधी अनेक मराठी मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याशिवाय नाटक, चित्रपट यांसारख्या माध्यमातूनही शिवानीने साऱ्यांची मन जिंकली. सध्या शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील तिच्या अक्षरा या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अशातच शिवानीचा मालिकेतील लूकही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार, ऐकूही येत नसल्याची दिली माहिती, म्हणाल्या, “माझ्यासाठी प्रार्थना करा कारण…”

मास्तरीन बाई ही भूमिका अगदी ती उत्तमरीत्या साकारत आहे. इतकंच नव्हे तर मास्तरीन बाईंच्या या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. मास्तरीन बाईं एका सीनसाठी मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी अक्षराच्या गळ्यातील मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अक्षराने गळ्यात अनेक दागिने घातले होते यापैकी गळ्यात तिने घातलेल्या खास साउथ इंडियन स्टाईल पेंडंटच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “तू माझा अभिमान आहेस आणि…”

अक्षराच्या गळ्यातील हे खास पेंडंट असलेलं मंगळसूत्र साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. युनिक असं डिझाइन असलेल्या या मंगळसूत्रात असलेल्या वाट्यांवरील नक्षी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अक्षराच्या गळ्यातील हे राजेशाही मंगळसूत्र वेगळं ठरत आहे.

Tags: Akshara Mangalsutra Designakshra mangalsutraentertainmentmarathi serialTula shikvin Changalach Dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bollywood actress Sonakshi Sinha's uncle talked about Shatrughan will be go her daughter’s wedding.

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातले नाराज, मामा म्हणाले, “लग्नात वडील येतील पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.