रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार, ऐकूही येत नसल्याची दिली माहिती, म्हणाल्या, “माझ्यासाठी प्रार्थना करा कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2024 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Alka Yagnik

सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार, ऐकूही येत नसल्याची दिली माहिती, म्हणाल्या, "माझ्यासाठी प्रार्थना करा कारण…"

ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावरुन खूप मोठी बातमी शेअर केली आहे. अलका यांनी त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान झाले असल्याचं सांगितलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, यामुळेच त्या काही काळ सिनेविश्वापासून दूर होत्या. त्यांनी असेही सांगितले की, अचानक आलेल्या या मोठ्या धक्क्याने त्यांना धक्का बसला आणि त्या अजूनही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर येताच त्यांचे चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. (Alka Yagnik)

काल अलका यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत सर्वांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यांना पुन्हा बरे होण्याची आशा असल्याने त्यांनी प्रार्थना करण्यासही सांगितले आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स व हितचिंतक. काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा मी फ्लाइटमधून उतरले तेव्हा मला अचानक जाणवले की मला काहीही ऐकू येत नाही. या घटनेनंतर काही आठवडे धैर्य दाखविल्यानंतर, मी आता माझ्या सर्व मित्रांसमोर व हितचिंतकांसमोर माझे मौन सोडू इच्छित आहे. मी इतके दिवस कुठे गायब होते याबाबत मी आज सर्वांना सांगणार आहे”.

आणखी वाचा – नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “तू माझा अभिमान आहेस आणि…”

त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या डॉक्टरांनी मला विषाणूच्या हल्ल्यामुळे एक दुर्मिळ संवेदी मज्जातंतू श्रवणशक्ती कमी झाल्याचे निदान केले आहे. या अचानक, मोठ्या धक्क्याने मला पूर्णपणे आश्चर्यचकित केले आहे. मी यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना, कृपया मला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करा”. अलका यांनी लोकांना मोठ्या आवाजातील संगीत व हेडफोन्सच्या संपर्कात येण्यापासून सावध राहण्याची विनंती केली आहे.

आणखी वाचा – प्रियाच्या हाती लागणार अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मरेजची फाईल?, अडचणीत होणार वाढ, रविराज या सगळ्यातून मार्ग काढू शकेल का?

त्या म्हणाल्या की, “माझ्या चाहत्यांना व तरुण सहकाऱ्यांना मी सांगेन की, खूप मोठ्या आवाजातील संगीत व हेडफोन्सच्या संपर्कात येण्याबाबत सावधगिरी बाळगा. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने व पाठिंब्याने मी माझ्या आयुष्याची पुनर्रचना करेन आणि लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेन अशी आशा आहे. तुमचा पाठिंबा व मला समजून घेणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे”.

Tags: Alka Yagnikalka yagnik healthbollywood singerentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Marathi actress Ruchira Jadhav expressed her reaction to the trolling for Eid wishesh photos

"महाराजांनी दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवलं का?", ईदबाबत बोलल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्रीचं उत्तर, म्हणाली, "गीतेतला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.