बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “तू माझा अभिमान आहेस आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2024 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde On Siddharth Bodke

नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, "तू माझा अभिमान आहेस आणि..."

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली. तितीक्षाच्या या मालिकेतील नेत्रा या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. अभिनयशिवाय तितीक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावरही तितीक्षा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तितीक्षा चर्चेत आली होती ती तिच्या लग्नामुळे. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. (Titeeksha Tawde On Siddharth Bodke)

तितीक्षा व सिद्धार्थच्या पारंपरिक अंदाजातील लग्नाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. अशातच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट तिने तिचा नवरा सिद्धार्थसाठी केली आहे. सिद्धार्थ आगामी JNU या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तितीक्षाने हा ट्रेलर शेअर करत तिच्या नवऱ्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – प्रियाच्या हाती लागणार अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मरेजची फाईल?, अडचणीत होणार वाढ, रविराज या सगळ्यातून मार्ग काढू शकेल का?

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

“तू माझा अभिमान आहेस सिद्धार्थ. मला माहित आहे की तु रुपेरी पडद्यावर जादू निर्माण करशील, कारण तुम्ही नेहमी असेच करता. माझं तुझ्यावर प्रेम आहे. २१ जूनपासून JNU सिनेमागृहात”, असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. राजकीय परिस्थितीमध्ये ज्वलंतपणे भाष्य करणारा JNU सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये असणारी काही वाक्य ही सध्याच्या राजकारणावर टोकदार भाष्य करणारी असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – रुपालीला नवीन शक्ती मिळाली, नेत्रा गरोदर असल्याचेही सत्य तिला समजणार, कुणाचा बळी की आणखी काही?

JNU च्या ट्रेलरमध्ये गंभीर विषय ज्वलंतपणे मांडण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. JNU सिनेमात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत असून याशिवाय उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, विजय राज, रश्मी देसाई, सोनाली सेवगल, अतुल पांडे व कुंज आनंद हे कलाकारही झळकणार आहेत. विनय वर्मा यांनी JNU सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २४ जूनला सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Tags: jnu moviemarathi actresssiddharth bodke new movietiteeksha tawdeTiteeksha Tawde On Siddharth Bodke
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
kangana ranaut new home

खासदारकी मिळताच कंगना रणौतने भावाला गिफ्टमध्ये दिलं घर, गृहप्रवेशाचे फोटो समोर, आतून आहे इतकं आलिशान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.