मनोरंजन विश्वात काम करताना अनेक अभिनेत्रींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही वाईट अनुभव येतात, पूर्वी कलाकार या वाईट अनुभवांबद्दल व्यक्त होत नाहीत. पण आता अनेक अभिनेत्री स्वत:हूं समोर येतात आणि हे वाईट अनुभव शेअर करतात. यापैकी एक मराठी अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. अभिनेत्री राधिका देशपांडे १६ वर्षांची असताना तिला ट्रेनमध्ये अतिप्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याबरोबर घडलेला हा प्रसंग सांगितला आहे आणि अतिप्रसंग करणाऱ्या व्यक्तीला तिने कशी अद्दल घडवली याबाबतही अभिनेत्रीने सांगितलं आहे. राधिका देशपांडेने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्याबरोबरच्या अतिप्रसंगाबद्दल सांगितलं आहे. (Radhika Deshpande Harassment)
याबद्दल अभिनेत्री असं म्हणाली की, “मी १६ वर्षांचीच होती. ट्रेन मधून प्रवास करत होते आणि वरच्या बर्थवर बसले होते. तेव्हा त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्याबरोबर माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान भाऊ कल्याण होता आणि त्याच्याही पेक्षा लहान छोटी बहीण होती. आम्ही तिघंच प्रवासस करत होतो. आमचे चवरंगचे जे प्रयोग व्हायचे त्यात मी नृत्यांगणा म्हणून काम करत होते. त्या दोघांना आम्ही घेऊन अहमदाबादला गेलो होतो आणि पुन्हा येताना त्यांनी सहज कुठे तरी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तर एकदा मला वाटलं मी झोपेत आहे. दोनदा मला लक्षात आलं. की काहीतरी विचित्र होत आहे. तिसऱ्यांदा मी त्याचा हातच पकडला. आणि त्या बोगीतून खाली उतरले आणि रात्री अडीच-तीन वाजता तमाशा केला. एक म्हातारा माणूस आणि एज जोडपं होतं त्यांनी सो जाओ सो जाओ म्हटलं”.
यापुढे राधिकाने असं म्हटलं की, “मला रात्रभर झोप आली नाही. तो जो मुलगा होता तो तिथेच होता आणि त्याकहा मित्रही तिथेच होता. मित्र आणि तो दोघेही घाबरले होते. माझ्याबरोबर असं काहीतरी झालं आहे हे मला ते सहनच होईना. माझ्याबरोबरच हे का झालं? मी का आले? आई-बाबांनी मला एकटीलाच का पाठवलं? हे असं का होत आहे? असे अनेक प्रश्न मला पडले. माझा भाऊ तेव्हा झोपला होता. मग मी त्याला सकाळी दहा वाजता उठवलं आणि त्याला सगळा प्रसंग सांगितला. तो लहानच होता, १२-१३ वर्षांचा होता आणि बहीण तर त्याच्यापेक्षाही लहान होती”.
आणखी वाचा – नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
यापुढे ती असं म्हणाली की, “मी भावाला म्हटलं, कल्याण मी त्याला झापड मारणार आहे आणि मी मारल्यानंतर त्याला तू पण मारायची. आमच्याबरोबर आई-बाबा नव्हते. मग् मी त्याला कानफाटात दिली. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी मला जाऊदे जाऊदे म्हटलं. असे लोक आपल्या समाजात असतात. मी सर्वांना म्हटलं, याने माझ्याबरोबर् अतिप्रसंग केला आहे. याला आधी खाली उतरवा. मग टीसीला बोलावण्यात आलं आणि त्याला दुसऱ्या स्टेशनला खाली उतरवण्यात आलं. त्याचा मित्रही उतरला. मग माझ्या मनाला शांती मिळाली. मला एकदम शांत शांत वाटलं”.