शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीच्या खऱ्या आईचा घरात प्रवेश, तर चारूहास त्याचवेळी आत्महत्या करण्यास गेले अन्…; भूवनेश्वरीची खेळी की आणखी काही?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 14, 2024 | 2:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada zee marathi serial update charulata enter in suryawanshi house new promo viral on social media

Tula Shikvin Changlach Dhada मालिकेला येणार नवीन वळण, सूर्यवंशी कुटुंबाची खरी लक्ष्मी करणार गृहप्रवेश

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट हे येतच असतात. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवताना दिसत आहे. प्रेक्षकांना कायमच मालिकेत पुढे काय होणार ही उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अक्षरा व अधिपती हनिमूनसाठी फुकेतला गेल्यावर अधिपतीचे वडील व भुवनेश्वरी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते. या भांडणात अधिपतीचे वडील भुवनेश्वरीला घराबाहेर काढतात. जेव्हा अधिपती व अक्षरा घरी परत येतात, त्यावेळी त्यांना भुवनेश्वरी घरात नसल्याचे जाणवते. ते भुवनेश्वरीला सगळीकडे शोधतात पण ती त्यांना सापडत नाही.

काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. बाजारात अक्षराला एक बाई दिसते, ओळखीची वाटल्याने आणि भुवनेश्वरीच असू शकते या विचाराने ती तिचा पाठलाग करते. समोर आलेल्या बाईला ती भुवनेश्वरी समजत असते पण समोरची महिला तुमचा काहीतरी गैरसमज झाल्याचे म्हणते. मी भुवनेश्वरी नसून चारुलता आहे, अशी ओळख ती सांगते. अशातच आता ‘झी मराठी वाहिनी’ने मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : मिठाई, विविध पदार्थ, समोसा-वडापाव अन्…; खुशबू तावडेचं असं झालं डोहाळे जेवण, बहीण तितीक्षाने पुरवले लाड

नवीन प्रोमोमध्ये चारुलता सूर्यवंशींच्या घरी प्रवेश करतानाचे पहायला मिळत आहे आणि स्वत: अक्षरा तिला या घरात घेऊन येतानाचे पाहायला मिळत आहे. तसंच चारुहास देवीआईकडे “चारुलता गेल्यानंतर प्रत्येक दिवशी मला तिची उणीव भासत आहे. ज्या एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं. त्या व्यक्तीला तू माझ्यापासून इतकं लवकर दूर का नेलंस? ती गेल्यापासून प्रत्येक दिवस मला ओझं वाटत आहे. त्यामुळे मला जगण्याचा काहीच अधिकार नाही” असं म्हणत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये कॅप्टन्सीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले सदस्य, अभिजीतच्या पायाला दुखापत, निक्की मार मार म्हणून ओरडली अन्…

यापुढे तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने हातात विषाची बाटली घेतानाचे पाहायला मिळत आहे, एकीकडे त्याच्या हातात विषाची बाटली आहे तर दुसरीकडे चारुलता दारातील माप ओलांडत सूर्यवंशींच्या घरात गृहप्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन काय ट्विस्ट येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? चारुहास या चारूलताला आपली आई  म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे          

Tags: Marathi Marathi Entertainment NewsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Abhijeet Kelkar Angry Post

"एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना…", निक्कीच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, "आई झाली की नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.