‘झी मराठी’ वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळतात. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवले आहे. या मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. सध्या ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत येणार रंजक वळण प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील कलाकार मंडळीही त्यांची भूमिका अत्यंत चोखपणे बजावताना दिसतात. (Tula shikvin Changlach Dhada team)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षराच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसत आहे. तर अधिपतीच्या भूमिकेत ऋषिकेश शेलार पाहायला मिळत आहे. दोघंही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच हृषीकेशने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृषीकेशने शेअर केलेली ही पोस्ट ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या टीमबरोबरची असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या ही टीम एकत्र असून थायलंड, फुकेट येथे धमाल मस्ती करत आहे. इतकंच नव्हे तर भारताबाहेर ही संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी रवाना झाली असून चित्रीकरणासाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. अक्षरा व अधिपती यांना घेऊन मालिकेची संपूर्ण टीम रवाना झालेली पाहायला मिळाली. निर्माती शर्मिष्ठा राऊत हीदेखील कलाकारांसह परदेशी रवाना झाली आहे. परदेशी चित्रीकरणाचा आनंद घेण्यासाठी ही टीम सज्ज आहे.
या प्रवासाचा एक सुंदर असा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी एकत्र विमान प्रवास करत डेस्टिनेशन गाठलेलं पाहायला मिळत आहे. परदेशी जाऊन आता मालिकेचा कोणतं कथानक चित्रित करण्यात येणार?, अक्षरा व अधिपती यांचा हनिमून सिक्वेन्स मालिकेत शूट होणार आहे का?, हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.