‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर पारूची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर अहिल्यादेवींनी पारूच्या लग्नाच्या घाट किर्लोस्कर मेन्शनमध्ये घातलेला पाहायला मिळत आहे. पारू लग्नासाठी सज्ज असली तरी मनातून त्या लग्नासाठी बिलकुलच तयार नसते. मालिकेच्या भागात असं पाहायला मिळालं की, पारूचा मेहंदी समारंभ संपन्न होणार असतो त्यासाठी अहिल्यादेवी स्वतः किर्लोस्कर मेन्शनमध्येच ही तयारी करताना दिसतात. लेकीची पाठवणी करण्यासाठी त्या सज्ज असतात. (Paaru Serial Update)
तर इकडे पारूच्या मनात हुरहुर लागून राहिलेली असते की तिचं लग्नाचं सत्य आहे ते हरीश सरांना सांगायलाच हवं कोणाची फसवणूक करुन तिला काहीही करायचं नाही, असं तिला मनोमनी वाटत असतं. तर इकडे दिशा व दामिनी पारूचा प्रत्येक समारंभ खराब कसा होईल आणि पारूला अहिल्यादेवींचा ओरडा कसा पडेल याकडे लक्ष ठेवून असतात आणि त्या काही ना काही करत पारुला त्रास देत असतात. मात्र पारू त्या त्रासातूनही मार्ग काढताना दिसते.
नुकतीच दिशा व दामिनीने मिळून मेहंदीची वाटी अहिल्यादेवींनी दिलेल्या त्यांच्या आवडत्या शॉलवर टाकलेली असते आणि पारूची खूप मोठी फसवणूक केलेली असते. मात्र पारुने त्यातूनही मार्ग काढलेला पाहायला मिळाला. तर प्रोमोमध्ये असं पाहायला मिळाले की, हळदी समारंभाच्या दिवशी पारू हरीश सरांना मंगळसूत्राचं सत्य सांगते. हे मंगळसूत्र ज्या दिवशी माझ्या गळ्यात पडलं त्या दिवशीच माझं लग्न झालं आहे आणि त्या दिवसापासून मी कोणाची तरी होऊन बसले.
हे ऐकल्यावर हरीशच्या पायाखालची जमीन सरकते. मंगळसूत्राचं सत्य, पारूच्या मनातली हुरहुर हरीश समजून घेईल का?, हरीश स्वतः त्या लग्नातून बाजूला होईल का?, की आणखी काही होणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.