रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीच्या घरामधून पैसे चोरीला, भूवनेश्वरीनेच केला होता प्लॅन, अक्षरा चोराला पकडणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 4, 2024 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula shikvin changlach dhada serial update Bhuvneshwari succeeded in stealing money from the adhipati’s home

अधिपतीच्या घरामधून पैसे चोरीला, भूवनेश्वरीनेच केला होता प्लॅन, अक्षरा चोराला पकडणार का?

‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण एक वर्षांपूर्वी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. दमदार स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करून घेतलं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे. काहीच दिवसांआधी अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अधिपतीवर आपलं प्रेम असल्याचं तिने मान्य केलं आहे. त्यामुळे अक्षरा-अधिपती या दोघांमधलं नातं आता बहरतं आहे. मात्र या दोघांमध्ये आता भुवनेश्वरी अडथळा आणत आहे.

नुकतेच भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना घराच्या बाहेर काढले आणि त्यांना त्यांचा संसार करायला सांगितले आहे. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिपती-अक्षरा यांच्या संसारासाठीचा आटापिटा सुरु आहे. पैशांसाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहेत.  अधिपती जास्त पैसे मिळण्यासाठी काहीतरी काम मिळालं पाहिजे असं म्हणत कुस्ती खेळतो. यात त्याला २५ हजार म्हणून बक्षीस मिळतात. मात्र हेच पैसे चोरीला जातात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – जब्याला शालू पटली! ‘फँड्री’ फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्ही लग्न…”

नुकताच या नवीन ट्विस्टबद्दलचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात अधिपती-अक्षरा राहत असलेल्या घरातील सामानाची नासधूस झालेली पाहायला मिळत आहे. घरातील डब्बे अस्ताव्यस्त पसरले असून त्यांनी ज्या डब्यात पैसे ठेवलेले असततात, तो डब्बाही पडलेला दिसतो. अधिपती-अक्षराच्या घरात ही चोरी भुवनेश्वरीने घडवून आणली आहे. भुवनेश्वरी दुर्गेश्वरीच्या मदतीने ही चोरी घडवून आणते.

आणखी वाचा –  Video : कॅन्सरमुळे हिना खानला कापावे लागले केस, लेकीची अवस्था पाहून आईला अश्रु अनावर, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

दरम्यान, अधिपती-अक्षरा आपल्या परीने संसार करण्याचा प्रयत्न करत आहे. कामावलेले पैसे चोरीला गेल्यामुळे आता यापुढे काय करावं असा प्रश्न दोघांना पडला आहे. अशातच आता ही चोरी भुवनेश्वरीने करवून आणली असल्याचे दोघांना कळणार का? पैसे चोरीला गेल्यामुळे अधिपती-अक्षरा यांचा पुढचा मार्ग काय असणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Its majja original series aathvi-a end and dahavi a new series is announced

'आठवी-अ' वेबसीरिजचा शेवटचा भाग प्रदर्शित, भरघोस प्रतिसादानंतर 'दहावी अ'ची घोषणा, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.