रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जब्याला शालू पटली! ‘फँड्री’ फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्ही लग्न…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 4, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Fandry fame Rajeshwari Kharat and Somnath Avaghade shared a cute video on social media

जब्याला शालू पटली! 'फँड्री' फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्हीं लग्न...”

दहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटाची आजही चर्चा होते. या चित्रपटाच्या कथेने व चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ‘फँड्री’ चित्रपटानंतर राजेश्वरी खरात काही कलाकृतींमध्ये झळकली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. राजेश्वरी खरात तिच्या बोल्ड व ग्लॅमरस लुकमधील फोटो शेअर करत असते, तिच्या या फोटोंची सोसजळ मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसते.

‘फँड्री’ चित्रपटात जब्या-शालू ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. आजही जब्या आणि शालूला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अजून काही ती वेळ पुन्हा आली नसली तरी जब्या आणि शालू सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून एकत्र पाहायला मिळतात. सध्या जब्या आणि शालूचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

आणखी वाचा – ‘त्या’ सीनसाठी गावकऱ्यांनी मदत केली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “शूटिंगमधील…”

या व्हिडीओमध्ये राजेश्वरी व सोमनाथने ‘फ्रँडी’ चित्रपटातील एक सीन पुन्हा रिक्रिएट केला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये जब्या शालूवर काळी राख उधळताना दिसला होता. हाच सीन या व्हिडीओत रिक्रिएट केला आहे. मात्र या व्हिडीओत जब्या शालूवर काळ्या राखऐवजी फुलं उधळताना दिसत आहे. दोघांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजेश्वरीने “& forever” असं लिहित हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीची हिंदी वेबसीरिजमध्ये वर्णी, हृता दुर्गुळेबरोबर ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

राजेश्वरी-सोमनाथच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “एक नंबर जोडी”, “जब्याला चिमणी सापडली”, “राख पाहिजे होती लेका”, “आमचा जब्या आणि त्याची नजर आहे तशीच आहे”, “अरं जब्या काळ्या चिमणीची राख उडवायची होती, फुलं नाही”, “राजश्री जब्या गरीब माणूस आहे पण मनाने दिलदार आहे. त्याच्याबरोबर लग्न करा” अशा अबेजक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

Tags: marathi entertainment newsRajeshwari KharatSomnath Avaghade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
angelina jolie breast cancer

कॅन्सरपासून वाचण्यासाठी 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली स्तनांची शस्त्रक्रिया, म्हणाली, "स्तन काढल्याने मातृत्वावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.