रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कॅन्सरमुळे हिना खानला कापावे लागले केस, लेकीची अवस्था पाहून आईला अश्रु अनावर, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 4, 2024 | 2:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood Actress Hina Khan cut her hair due to cancer and she shared a heart touching video

Video : कॅन्सरमुळे हिना खानला कापावे लागले केस, लेकीची अवस्था पाहून आईला अश्रु अनावर, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही सध्या स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत आहे. हिना खानला अंतिम टप्प्यातल्या कर्करोगाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. तिच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. हिना तिच्या आरोग्याविषयीची प्रत्येक बातमी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओबरोबर  हिनाने एक पोस्टही लिहिली आहे. कॅन्सरमध्ये केमोथेरपीदरम्यान केस गळत असल्याने हिनाने तिचे लांब केस कापले आहेत. हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. त्यामुळे लेकीला मिठीत घेत आईने भावनांना वाट मोकळी करून दिली. 

हिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिना ही खुर्चीवर बसली आहे आणि तिच्या आईला रडू नकोस म्हणते. “मी फक्त तिचे केस कापत आहे. ते पुन्हा येतील. तुदेखील तुझे केस कापले आहेत आणि ते पुन्हा आले. तसेच माझे केसही पुन्हा येतील” असे हिना आपल्या आईला समजावत आहे. हिनाचा प्रियकरदेखील हिनाच्या आईची समजूत घालताना “तुम्ही रडू नका” असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर हिना तिच्या हेअर ड्रेसरला तिचे केस कापायला सांगते. हा खास व्हिडीओ शेअर करत हीनाने याखाली खास पोस्ट लिहीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

या व्हिडीओखाली तिने असं म्हटलं आहे की, “तुम्ही माझ्या आईचा काश्मिरीमध्ये रडणारा आवाज ऐकू शकता. (मला आशीर्वाद देत) खरंतर तिने स्वतःला अशा गोष्टीचे साक्षीदार होण्यासाठी तयार केले आहे ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. इथल्या सर्व सुंदर लोकांसाठी, विशेषत: स्त्रिया ज्या या लढाई लढत आहेत. मला माहित आहे की, हे कठीण आहे, मला माहित आहे की आपल्यापैकी सर्वांसाठी केस हे एक मुकुटासारखे आहे. जे आम्ही कधीही काढत नाही. पण जर तुम्ही इतक्या कठीण लढाईला तोंड देत असाल तर तुम्हाला तुमचे केस गमवावे लागतील. तुमचा अभिमान, तुमचा मुकुट? तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि मी जिंकणे निवडले आहे.

आणखी वाचा – ‘त्या’ सीनसाठी गावकऱ्यांनी मदत केली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “शूटिंगमधील…”

यापुढे हिना असं म्हणते की, “ही लढाई जिंकण्यासाठी मी स्वतःला प्रत्येक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सुंदर केस गळणे सुरु होण्यापूर्वी मी ते कापून टाकणे निवडले. मला हे मानसिक विघटन सहन करायचे नव्हते. म्हणून, मी माझा मुकुट सोडणे निवडले आहे कारण मला समजले आहे की माझा खरा मुकुट हे माझे धैर्य, माझी शक्ती आणि माझे स्वतःवर असलेले प्रेम आहे. केस परत वाढतील, भुवया परत येतील, परंतु आत्मा संपूर्ण राहिला पाहिजे.

आणखी वाचा – जब्याला शालू पटली! ‘फँड्री’ फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्ही लग्न…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी माझी कथा, माझा प्रवास नोंदवून ठेवत आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी की स्वत:ला स्वीकारण्याचा माझा प्रयत्न तिथल्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल. माझ्या कथेने या हृदयस्पर्शी पण त्रासदायक अनुभवाचा एक दिवसही एखाद्यासाठी अधिक चांगला बनवता आला, तर ते फायदेशीर आहे.”

Tags: hina khanhina khan cancerHina Khan Cancer News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Tula shikvin changlach dhada serial update Bhuvneshwari succeeded in stealing money from the adhipati’s home

अधिपतीच्या घरामधून पैसे चोरीला, भूवनेश्वरीनेच केला होता प्लॅन, अक्षरा चोराला पकडणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.