शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीने चारुहासला काढलं घराबाहेर, हाताने धरुन खेचलं अन्…; अक्षरापासूनही दूर होणार?, पुन्हा वाद

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 6, 2024 | 3:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update Adhipati took the charuhas out of the house

अधिपतीचा राग अक्षरा आणि त्याच्या नात्यात नवीन समस्या आणणार?

Tula Shikvin Changlach Update : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये आता कुठे अधिपती आणि अक्षराच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरु झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता पुन्हा या दोघांच्या नात्यात दुरावा येण्यासारखी परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात दुरावा येणार आहे. अक्षरा व अधिपती हनीमूनवरून कोल्हापुरात परातले आहेत. घरात आल्यावर अधिपतीला चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते. ते ऐकून अधिपती अत्यंत चिडतो. हेच कारण की, अधिपती आणि अक्षरा हनिमूनला निघाले असताना चारुहास अक्षराला कॉल करतो आणि तिला सांगतो की, तिने कोणत्याही परिस्थितीत अधिपतीशी भुवनेश्वरीला फोनवर बोलू देऊ नये. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)

चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखल्याचा आणि योजनेचा एक भाग म्हणून जाणूनबुजून त्याला व अक्षराला हनिमूनसाठी पाठवल्याचा आरोप अधिपती करतो. थायलंडवरुन परत आल्यानंतर अधिपती “आईसाहेब घरात दिसत का नाहीत?” हे विचारतो. यावर त्याला चारुहासने आपल्या आईला घराबाहेर काढलं असल्याचं कळतं. त्यामुळे  आईला घराबाहेर काढल्याचा राग येऊन अधिपती वडिलांच्या अंगावर धावून जातो. अधिपती चारुहासचा गळा पकडत “तुमची हिंमत कशी झाली?” असा थेट प्रश्न विचारतो. मात्र या दोघांमध्ये अक्षरा येते आणि अधिपतीला अडवते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा संपन्न, Ex-boyfriend म्हणत शेअर केले फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अधिपतीचे चारुहासबरोबर भांडण होते. तसंच अधिपती व अक्षरा यांच्यातही मोठा वाद होतो. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलिस तक्रार ही दाखल करतो. मात्र त्याला भुवनेश्वरी कुठेही दिसत नाही. म्हणून तो पुन्हा घरात येतो आणि आईवरच्या अतिप्रेमामुळे तो चारुहास व अक्षराला घराबाहेर काढतो. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात अधिपती चारुहाससह अक्षरालाही घराबाहेर काढतानाचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे ऐश्वर्या नारकर त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाल्या, “पैसा, वेळ, शक्ती सगळंच…”

त्यामुळे आता अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेऊ शकेल का? अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये चारुहासमुळे गैरसमज निर्माण होणार का?  आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे.

Tags: marathi serialMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navari Mile Hitlerla New Promo lila special ukhana

लग्नानंतर लीलाची पहिली मंगळागौर, ऐजेंसाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, "वचन देते मी तुम्हाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.