झी मराठीवर भावा बहिणींच्या नात्यावर आधारीत ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका अलीकडेच सुरू झाली. मालिकेचे कौतुक होण्याचं एक कारण म्हणजे, या मालिकेद्वारे अभिनेता नितिश चव्हाणने झी मराठीवर कमबॅक केलं. शिवाय बहिणींना आईची माया देऊन जपणारा सूर्यादादा प्रेक्षकांना विशेष भावतो आहे. या मालिकेतील सूर्या आणि तुळजा ही फ्रेश जोडीही रसिकांचे मन जिंकत आहे. मालिकेत कायमच नवनवीन ट्विस्ट येत असतात आणि हे ट्विस्टच प्रेक्षकांना खिळवून ठेवत असतात. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला आहे, ज्यात भाग्या तिच्या शिक्षणासाठी सूर्यादादापासून लांब जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. (lakhat ek amcha dada)
या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये सूर्यादादा भाग्याला सोडण्यासाठी येतो तेव्हा ती त्याला स्वेटर घालेन, एकटी फिरणार नाही असं म्हणते. तेव्हाच तिच्या मागे बसलेला मुलगा तिला वाईट नजेरेन बघतो आणि आता तर मैदानच मोकळं मिळालं असल्याचे म्हणतो. प्रोमोमध्ये पुढे तो चिंगम खाऊन तिच्या बसण्याच्या जागेवर ठेवतो. यामुळे तिच्या कपड्यांना तो चिंगम लागतो आणि हा चिंगम काढण्यासाठी ती बाथरुममध्ये गेलेली असताना तो मुलगा तिचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी सूर्यादादाला बहिणीबाबत काहीतरी वाईट घडत असल्याचे जाणवते.
आणखी वाचा – कियारा अडवाणी रुग्णालयात भरती?, अभिनेत्रीच्या टीमने सांगितलं सत्य, नेमकं काय झालं?
मालिकेच्या याच प्रोमोवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली.प्रोमोखाली कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या प्रोमोखाली एकाने “कृपया अशा प्रकारचे सीन मालिकेमध्ये दाखवू नका, त्यातून तरुण पिढी काय शिकेल?” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “काहीही दाखवायचे आणि समाजातील लोकांना जागृत करायचं? झी वाले अक्कल कुठे गेली?” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एकाने “टीआरपीसाठी काहीही करतील” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा घटस्फोट घेणार?, नक्की दोघांमधील वाद काय?, चर्चांना उधाण
याचबरोबर एका प्रेक्षकाने या संपूर्ण प्रकरणी त्याचा संताप व्यक्त केला आहे. “आधी त्या तेजुला तो शत्रु कसा त्रास देतो ते दाखवता आणि आता तर हद्दच केली त्या भाग्यश्रीचा व्हिडीओ बनवत आहे. एक मुलगा हे सगळं करताना दाखवुन तुम्ही प्रेक्षकांना आणि नवीन पिढीला काय शिकवण देत आहात. अतिशय नीचपणाचा कळस गाठला आहे”. असं म्हटलं आहे. तसंच “काही चांगल दाखवता येत नसेल तर मालिका बंद करा. असले स्त्रियांवर अत्याचार करुन नवीन पिढीला कशाला वाईट वळण लावत आहात. स्त्रियांचा आदर कसा करायचा ते दाखवा” असं म्हटलं आहे.