‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अक्षरा व अधिपती यांचा प्रेमाचा प्रवास पाहणं रंजक ठरत आहे. मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या अव्वल ठरत आहे. या मालिकेत अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी, चारूहास, सरगम या पात्रांचा अभिनय पाहणंही रंजक ठरत आहे. (Tula Shikvin Changlach Dhada Promo)
अक्षरा व अधिपती यांच्या प्रेमाच्या प्रवासात भुवनेश्वरी मात्र नवनवीन अडचणी निर्माण करत असते. अक्षरा व अधिपती एकत्र येऊ नयेत म्हणून भुवनेश्वरी अनेक चाल आखते. मात्र अक्षरा भुवनेश्वरीची ही चाल ओळखून असते. तर अधिपतीच्या वाढदिवसालाही अक्षराने औक्षण केल्याने व सरप्राइज गिफ्ट दिल्याने भुवनेश्वरीचा संताप होतो. यावेळेला ती अधिपतीकडून सहानुभूती मिळवते. त्यावेळी अक्षरा अधिपतीसमोर प्रेमाची कबुलीही देणार असते, मात्र ते राहून जातं.
अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, थेट अक्षराने अधिपतीसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अक्षरा अधिपतीला म्हणते, “मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर मला आयुष्य काढायचं आहे”. यावर अधिपती म्हणतो, “चिडावं कशाला?”. त्यानंतर अक्षरा म्हणते, “मी तुम्हाला सांगायचं किती प्रयत्न करतेय, तुमच्या लक्षात येतं नाही आहे का?”. यावर अधिपती विचारतो, “काय लक्षात येतं नाही आहे?”. तेव्हा अक्षरा म्हणते, “ठीक आहे. मग मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. तुम्हाला बघितलं की नाही की नुसता इशय हार्ड होतोय. अधिपती आय लव्ह यु”.
अखेर बऱ्याच दिवसांपासून अक्षराला अधिपतीसमोर प्रेमाची कबुली द्यायची असते. आणि अक्षराने थेट कोल्हापुरी भाषेत प्रेमाची जाहीर कबुली दिलेली असते. हा प्रोमो पाहून आता अक्षरा व अधिपती यांच्यातील प्रेम बहरणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.