झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांना संमोहित केले आहे. मात्र आता सगळेच वशमधून बाहेर आले आहेत. याचदरम्यान नेत्रा व अद्वैत यांच्यातील प्रेम बहरतानाचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी नेत्रा व अद्वैत यांचा एक प्रोमो आला होता. या प्रोमोद्वारे अद्वैत व नेत्रा यांना त्यांचे स्वत:चे मूल हवे असल्याचे दाखवण्यात आले होते. या प्रोमोमध्ये अद्वैतने “आपल्यासुद्धा पदरात एक लहान मुल पडायलाच हवं” असं म्हणत तिच्याकडे बाळाची इच्छा व्यक्त केली होती आणि ती इच्छा अखेर आता पूर्ण झाली असल्याचे कळत आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा नुकताच आलेला एक प्रोमो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा आई होणार असल्याची खुशखबर देण्यात आली आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्राला डॉक्टर ती आई होणार असल्याची खुशखबर देतात. ही खुशखबर ऐकताच नेत्रा आनंदी होते. मात्र त्यानंतर ती चिंतेत पडते. आणि लगेच उठून घरात जाते.
आणखी वाचा – “तब्येत खूपच बरी नसल्यामुळे…”, प्रथमेश परबच्या बायकोने पाहिला त्याचा नवा चित्रपट, “अक्षरशः डोळ्यातून पाणी…”
घरात जाऊन ती बघते तर रुपाली बसलेली असते आणि ती रुपालीकडे बघतच बसते. दरम्यान् पूर्ण प्रोमोमध्ये नेत्रा एका श्लोकाची उकल करताना दिसत आहे. “नयनकर्ण दोन अन् मस्तिष्क एक. मात्रा तसूभरही जरी युद्धासमय बदलता, निखळ काहरे हे अस्त्र अन् दूर जायी सफलता” हा संपूर्ण श्लोक नेत्राच्या तोंडी दिसत आहे.
त्यामुळे एकीकडे ती आई होणार असल्याची खुशखबर देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे नेत्राने केलेल्या श्लोकांची उकल ही नव्या संकटाची चाहूल असल्याचे वाटत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागांत नेत्रासह राजाध्यक्ष कुटुंबियांवर काय नवीन संकट येणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.