शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आता विषय हार्ड व्हनार! ‘तुला शिकवीन…’ फेम अधिपती-अक्षरा परदेशात करत आहेत एन्जॉय, व्हिडीओ चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 20, 2024 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial fame Adhipathi-Akshara shared a special video of them from the beach in Thailand

आता विषय हार्ड व्हनार! ‘तुला शिकवीन...’ फेम अधिपती-अक्षरा परदेशात करत आहेत एन्जॉय, व्हिडीओ चर्चेत

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते. 

अक्षरा व अधिपती आता लवकरच हनिमूनला जाणार असल्याचा सीक्वेन्स मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मालिकेची टीम शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे.  ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली आहे. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली आहे. याची खास झलक शर्मिष्ठाने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “तेव्हा कुणीही पाठीशी उभं राहिलं नाही”, ‘वेड’ चित्रपटाबद्दल रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला, “शूटिंग वगैरे झालं होतं आणि…”

अशातच अक्षरा-अधिपती यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे थायलंडमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अधिपती-अक्षरा थायलंडमधील समुद्रकिनारी धावताना पाहायला मिळत आहे. ‘कहो ना प्यार है’ या लोकप्रिय गाण्यावर या दोघांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओमध्ये अधिपती-अक्षराचा खास लुकदेखील पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : गावी भातलावणी, भजन अन् खेकडे पकडण्यात रमला निखिल बने, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, साधेपणाचं कौतुक

या व्हिडीओमध्ये साडीतल्या मास्तरीण बाई पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहेत. तर अधिपतीनेही पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅंट परिधान केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ प्रेक्षकांना चांगलाच आवडला असून अनेकांनी याबद्दल कमेंट्सद्वारे प्रतिक्रियादेखी दिल्या आहेत. तसेच त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हृतिक व अमीषा यांची आठवण झाली असल्याचेही म्हटलं आहे.      

Tags: marathi entertainment newsmarathi serialtula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Varsha Usgaonkar Bigg Boss Marathi

वर्षा उसगांवकरांची 'बिग बॉस'मराठी मध्ये एण्ट्री?, 'सुख म्हणजे…' सोडल्यानंतर चर्चांना उधाण, प्रेक्षक म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.