Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना कथानकाशी नेहमीच खिळवून ठेवतात. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. चारुलताने घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचे आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. (Tula Shikvin Changlach Dhada Serial News)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चारुलता एकीकडे अधिपतीविषयी काळजी व प्रेम व्यक्त करत आहे. पण दुसरीकडे अधिपती तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने चारुलताला समजून घ्यावे म्हणून समजूतहे काढली. पण अधिपती त्याच्या निर्णयावर ठाम असून तो चारुलताला आपकी आई म्हणून स्वीकारण्यास तयारच नाही. त्यामुळे या सगळ्याला वैतागून आता चारुलता घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे. याच संबंधित एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा चारुलताची समजूत काढत असं म्हणते की, काळाच्या ओघात सगळं नीट होईल आणि सर्व नाती पुन्हा नीट होतील. तुमच्यातीळ अंतरही दूर होईल. त्यामुळे थोडा वेळ द्या”. एकीकडे अक्षरा घरातील नाती सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे दुर्गेश्वरी हेच घर तोडण्याचा विचार करत आहेत. याच घरात राहून हे घर तोडले पाहिजे असं म्हणत ती घरातील नाती तोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच चारुलतालाही तिच्या या घरात राहण्याने त्यांच्यामधील अंतर आणखी वाढू शकतं असं म्हटलं आहे. यानंतर ती घरातून बॅग घेऊन बाहेर पडते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये जाण्यासाठी बायकोचा अभिजीत सावंतला होता नकार, स्वतःच म्हणाली, “तिथे फक्त भांडणं…”
तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चारुलता एकीकडे अधिपतीविषयी काळजी व प्रेम व्यक्त करत आहे. पण दुसरीकडे अधिपती तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नाही असं दिसून येत आहे. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागात अक्षरा अधिपतीने चारुलताला समजून घ्यावे असं म्हणते. त्यामुळे ती घर सोडून जाणार की अक्षरा तिला थांबवणार? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.