Bigg Boss 18 Wildcard Contestant : ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा ‘बिग बॉस’ हिंदीकडे लागल्या आहेत. सलमान खानचा सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ नेहमीच चर्चेत असलेल्या कार्यक्रमापैकी एक आहे. त्यामुळे यंदाचंही हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या ‘बिग बॉस १८’च्या पर्वात बॉलिवूड, टेलिव्हिजन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा समावेश असलेला दिसून आला. यावेळी कार्यक्रमात अनेक टेलिव्हिजन कलाकारांचा सहभाग दिसत आहे. दरम्यान, या रिऍलिटी शोमध्ये विवियन डिसेनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शोमध्ये त्याची स्पष्टवक्ते शैली पाहायला मिळत आहे.
आता या सगळ्या दरम्यान एका बातमीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विवियन डिसेनाची माजी पत्नी वहबिज दोराबजी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मात्र, आता अभिनेत्रीने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली असून ती या सीझनचा भाग नसल्याचे सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, “माझ्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याबाबत अफवा पसरत आहेत, मला त्या दूर करायच्या आहेत. मी या वर्षी शोमध्ये एंट्री घेत नाही आणि माझी तशी इच्छाही नाही”.
पुढे वहबिज म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे काही आहे त्यात मी खूप आनंदी आहे आणि माझी शांती गमावू इच्छित नाही. मी भविष्यात शोचा नक्कीच विचार करेन, पण या वर्षी अजिबात नाही. मी माझा नवीन शो Deewaniyat चं शूटिंग सुरु झालं आहे. जे लवकरच स्टार प्लसवर सुरु होईल. पडद्यावर परत येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”.
विवियन व वहबिज यांची भेट ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. यानंतर ते प्रेमात पडले आणि २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांची एकत्र जोडी चाहत्यांना खूप आवडली. मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. त्याने २०१७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. बिग बॉसबद्दल सांगायचे तर, शोमध्ये विवियन चाहतबरोबर भांडताना दिसत आहे. झोपण्याच्या जागेवरुन दोघांमध्ये भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळालं.