Tula Shikvin Changlach Dhada : छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात. मनोरंजनाच्या साधनातील एक महत्त्वाचा भाग म्हणून टीव्ही मालिकांकडे पाहिले जाते. त्यातील काही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. मालिकेच्या कथानकाबरोबर कलाकारांचा अभिनयदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. अशाच काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका. या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. चारुलताने सूर्यवंशांच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. एकीकडे अधिपती चारुलताला स्वीकारण्यास तयार नाही पण दुसरीकडे अक्षरा मात्र त्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षराला चारुलताचे सत्य समजणार आहे.
मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये चारुलता व भुवनेश्वरी एका मुखवट्यामागून अक्षराला त्या चारुलता व भुवनेश्वरी असल्याचे सांगतात. चारुलता तिच्या लूकमधून अक्षराला म्हणते की, “अक्षरा विश्वास ठेव मीच चारुलता आहे”. तर भुवनेश्वरीही अक्षराला असं म्हणते की, “चारुलताचे रूप घेतलेली मीच आहे भुवनेश्वरी”. यानंतर दोघी अक्षराला गोंधळात टाकतात. त्यामुळे अक्षरा पुरतीच गोंधळून जाते आणि यांतर मला त्रास होतो आहे असं म्हणते. पण पुढे ती चारुलता आणि भुवनेश्वरी यांच्यामागचं सत्य शोधणार असं म्हणते.
आणखी वाचा – सूरज चव्हाण प्रचारसभेत, स्टेजवर जाऊन भाषणही केलं, अजित पवारांना पाठिंबा
दरम्यान, मालिकेच्या या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी गायब आहे. ती गायब झाल्यानंतर चारुलताची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता दोघींमध्ये नक्की खरी कोण? किंवा या दोघीच एक आहेत का? की भुवनेश्वरीच चारुलता आहे? हे सत्य लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.