राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असून प्रचारांना दणक्यात सुरुवातदेखील झाली आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारानिमित्त अनेकदा अनेक कलाकार मंडळी राजकीय पक्षांच्या मंचावर पाहायला मिळतात. अशातच सध्या सर्वत्र एका कलाकाराची जोरदार चर्चा सुरु आहे आणि हा कलाकार म्हणजे ‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता सूरज चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यापासून सूरज चव्हाणची अवघ्या महाराष्ट्रभरात चर्चा सुरु आहे. अशातच सूरजने अजित पवारांच्या प्रचारसभेत हजेरी लावली. राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी काल (२८ ऑक्टोबर) त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. (Suraj Chavan Ajit Pawar Support)
यावेळी अजित पवारांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात पहिली प्रचाराची सभा घेतली आणि या सभेत सूरज सहभागी झाला होता. अजित पवारांच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीरसभेत तोंडाला मास्क लावून सूरज सभेच्या ठिकाणी आला. मंचावर जात त्याने उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देत सूरजचं स्वागत केलं. यावेळी सूरजने भाषण देत असं म्हटलं की, “नमस्कार… मी तुम्हा सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. आई मरी माता… ॐ नम: शिवाय… शिव शंभो… हर हर महादेव… गणपती बाप्पा मोरया… दादांनी माझं स्वप्न पूर्ण केलं आहे. दादांनी मला मदत केली आहे. यासाठी दादांचे मनापासून आभार मानतो”.
आणखी वाचा – अर्जुन कपूर व मलायका अरोरा कायमचे विभक्त?, ब्रेकअपच्या चर्चांवर अभिनेत्याचा शिक्कामोर्तब, म्हणाला…
यापुढे सूरजने सर्वांना अजित पवारांना मतदान करण्याचे आवाहनही केलं. याबद्दल त्याने असं म्हटलं की, “तुम्ही सर्वांनी दादांना झापूक झुपूक मतदान करा. आपल्या दादांना फुल खवून, मतदान करा”. एबीपी माझाच्या सोशल मीडियाद्वारे सूरजचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने आपल्याला घर नसल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे बाहेर येताच त्याने मी आता ‘बिग बॉस’सारखे घर बांधणार असल्याचे म्हटलं. यानंतर अजित पवारांनी सूरजसाठी 2BHK घराची घोषणा केली. नुकताच अजित पवारांनी घोषणा केल्याच्या सूरजच्या नवीन घरचा भूमिपूजन सोहळाही पार पडला. अशातच आता सूरजने अजित पवारांच्या प्रचारसभेतही सहभाग घेतला आहे.
आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवीकोरी आलिशान कार, खास नावही ठेवलं अन्…; फोटो व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणार आहे. यात सूरजकडून अजित पवारांना पाठींबा मिळाल्याने आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे