Saatvya Mulichi Saatvi Mulgi : रहस्यमय कथानकामुळे प्रेक्षकांची आवडती झालेली मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. लिकेत इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर नेत्रा आणि अद्वैतमधे यावरून संवाद होतं. नेत्रा तिची चाललेली धडपड अद्वैतकडे व्यक्त करत सगळं सांगते. तेव्हाच घरात चारही बायकांचं एकमत होतं की घरातल्याना आपण एकत्र ठेवण्यातच खरा आनंद आहे. जिथे केतकी भरभरून बोलते आणि केतकीचा नवरा केदार घरात प्रवेश करतो. (Saatvya Mulichi Saatvi Mulgi Serial Update)
केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित उलगडलेलं नाही. केदारच्या येण्याने घरात सर्वांनाच आनंद होतो. पण काही जण त्याच्या घरातील एन्ट्रीवर शंका उपस्थित करतात. नेत्रा, इंद्राणी यांना आता केदारचा संशय येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोमवारच्या भागात नेत्राच्या लेकीला एक वाईट स्वप्न पडतं. यात तिला एका बाईला एक माणूस धारदार शस्त्राने मारताना दिसतो.
आणखी वाचा – सूरज चव्हाण प्रचारसभेत, स्टेजवर जाऊन भाषणही केलं, अजित पवारांना पाठिंबा
मालिकेतील याच कथानकाचा एक प्रोमो समोर आला आहे आणि ऊयायत केदार मैथिलीवर हल्ला करतानाचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्राची मुलगी एक गाणं गाणारा माणूस मैथिलीला मारत असल्याचे सांगते. त्यानंतर दिवाळीच्या फटाक्यांमध्ये केदार मैथिलीवर हल्ला करत असताना नेत्रा तिथे पोहोचते आणि ती मैथिलीला वाचवते. “मैथिली मावशीला हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे” असं म्हणत ती केदारला दूर सारते.
आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवीकोरी आलिशान कार, खास नावही ठेवलं अन्…; फोटो व्हायरल
त्यानंतर केदार नेत्राला “मी हे घर कायमचं तोडायला आलो आहे”. असं म्हणतो. यावर नेत्रा तीला उत्तर देत असं म्हणते की, “मी हे घर तोडायला आले आहे, पण मी या घरात माणसे जोडायला आले आहे”. सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत असून आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आता नेत्रा, इंद्राणीचा केदारवरील संशय खरा ठरणार का? दिवाळीत राज्याध्यक्ष कुटुंबातलं अजून कोणतं रहस्य उघडकीस येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.