Riteish Deshmukh Mom Birthday : हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुखांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्याचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत. विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्षे झाली असली तरीदेखील त्यांच्या आठवणीत त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हळहळतोच. रितेशही आपल्या वडिलांच्या आठवणीत अनेकदा हळहळताना दिसला आहे.
रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख ही जोडी त्यांच्या कामातून वेळात वेळ काढत कुटुंबाला विशेष वेळ देताना दिसते. रितेशही त्याच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून त्याच्या आईला, मुलांना, बायकोला वेळ देताना दिसतो. अशातच रितेशने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्तचा आहे. यामध्ये त्याच्या आईच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ६५ व्या वर्षी संजय दत्तने चौथ्यांदा केलं लग्न, मान्यता दत्तच्या सध्या लूकची चर्चा, फोटो व्हायरल
रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे दोन्ही भाऊ अमित व धीरज त्याच्या आईचे औक्षण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने, “हॅपी बर्थडे आई. लव्ह यु”, असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये देशमुख यांचे संस्कार पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – चारुलता कायमचं घर सोडून जाणार, पण अक्षरा सासूबाईंना थांबवण्याच्या तयारीत, नक्की काय निर्णय घेणार?
रितेशने देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रितेशला त्याच्या आईबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रितेशने उत्तर देत असं म्हटलं होतं की, “माझ्या आई या गृहिणी होत्या. त्यांनी उत्तम घर सांभाळलं, त्याचबरोबर आमचं शिक्षणही केलं. आज अमित भैय्या व धीरज हे राजकारणात आहेत आणि मी मनोरंजन क्षेत्रात आहे. पण आमचं शिक्षण होण्यात आमच्या वडिलांपेक्षा आईचा हात अधिक आहे आणि हेच खूप महत्त्वाचे आहे की, तुम्ही तुमचं घर कसं राखत आहात?. त्यावेळी आईने आम्हाला जाणीवपूर्वक इंग्रजी शाळेत घातलं”.