शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भावा कडक!”, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचा नवीन लूक पाहून चाहते फिदा, ‘त्या’ सीनसाठी घेतली अशी मेहनत, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changalch Dhada fame Actor Hrishikesh Shelar shared special photos in his wrestling look.

"भावा कडक!", 'तुला शिकवीन...'मधील अधिपतीचा नवीन लूक पाहून चाहते फिदा, 'त्या' सीनसाठी घेतली अशी मेहनत, फोटो व्हायरल

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेतील अक्षरा व अधिपती यांचं नातं प्रेक्षकांना चांगलंच भावत आहे. काहीच दिवसांआधी अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अधिपतीवर आपलं प्रेम असल्याचं तिने मान्य केलं आहे. नुकतंच भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना सुर्यवंशी घराण्याच्या रितीनुसार, खऱ्या संसाराला सुरुवात व्हायच्या आधी नवरा-बायकोने अंगावरील कपड्याबरोबर दहा दिवस घराबाहेर राहायचं, सूर्यवंशी घराण्याची ओळख न सांगता सगळ्या अटी पाळून, एकमेकांची साथ न सोडता बाहेरच्या जगात नीट राहू शकले तर त्यांचा संसार सुखाचा होतो असं म्हणून घराबाहेर पडायला भाग पाडले.

यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिपती-अक्षरा यांच्या संसारासाठीचा आटापिटा सुरु आहे. पैशांसाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहेत. अधिपती जास्त पैसे मिळण्यासाठी काहीतरी काम मिळालं पाहिजे असं बोलत असतानाच त्याला कुस्तीच्या शर्यतीचे पोस्टर दिसते. त्यावर स्पर्धा जिंकणाऱ्याला २५,००० बक्षीस लिहिलेले असते. त्यामुळे पैशांसाठी अधिपती कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतो. नुकताच या नवीन ट्विस्टचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता आणि या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Shelar (@hrishishelar)

आणखी वाचा – ‘नवरी मिळे…’ मालिकेचे १०० भाग पूर्ण, लीलाने शेअर केले एजेंबरोबरचे Unseen Photos, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव  

मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलारने त्याचे या कुस्तीच्या लूकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. मालिकेशिवाय ऋषिकेश हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो आणि त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने नुकत्याच शेअर केलेल्या या खास फोटोंना चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ऋषिकेशने त्याचे कुस्तीच्या लूकमधील खास फोटो शेअर करत “रगत निघल.. तरी बी Hustle” असं लिहिलं आहे.  

आणखी वाचा – देशमुखांच्या सूनेचा परदेशात अनवाणी प्रवास, रस्त्यावरुन फिरताना दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल

ऋषिकेशने शेअर केलेल्या या फोटोला अल्पावधीतच तूफान प्रतिसाद दिला आहे. त्याच्या या फोटोखाली अनेक मराठी कलाकारांसह ऋषिकेशच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “भावा एक नंबर”, “एकदम कडक”, “विषय हार्ड”, “लय भारी”, “नादखुळा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या फोटोला दाद दिली आहे. तसेच स्वानंदी टीकेकर, अक्षया नाईक, अदिती द्रविड आदी कलाकारांनीही ऋषिकेशच्या या फोटोला लाईक्स, कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.

Tags: hrishikesh shelarmarathi entertainment newstula shikvin changalch dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Navri Mile Hitlerla zee marathi seial AJ and Leela reception ceremony bts video

असा पार पडला एजे-लीला यांचा रिसेप्शन सोहळा, जहागीरदारांनी शूटिंगसह मजामस्तीही केली अन्..., BTS व्हिडीओ समोर  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.