शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देशमुखांच्या सूनेचा परदेशात अनवाणी प्रवास, रस्त्यावरुन फिरताना दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 1:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh shared a video of herself walking barefoot on the streets of New York City

देशमुखांच्या सूनेचा परदेशात अनवाणी प्रवास, रस्त्यावरुन फिरताना दिसली अन्...; व्हिडीओ व्हायरल

हिंदी व मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचीच आवडती व लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून रितेश व जिनिलिया यांना ओळखले जाते. तसेच त्यांच्यातील नवरा-बायकोचा बॉण्ड हा नेहमीच खास असल्याचे दिसून येते. मनोरंजनसृष्टीत कायम चर्चेत असणारी ही जोडी सोशल मीडियावरील त्यांच्या फोटो व व्हिडीओमुळेदेखील तितकीच चर्चेत राहत असते. रितेश-जिनीलिया नेहमीच एकमेकांबरोबरचे अनेक रील-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आणि त्यांचे हे व्हिडीओ चाहत्यांनादेखील भलतेच आवडतात.

रितेश व जिनिलिया हे सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्याचबरोबर ते दोघे त्यांचे अनेक मजेशीर रील-व्हिडीओही शेअर करत असतात.  त्यांच्या या गंमतीशीर व्हिडीओंना चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळते. अशातच जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती परदेशात रस्त्यावरुन अनवाणी चालत आहे. पायात चप्पल न घालता जिनिलिया परदेशातील रस्त्यावरुन अनवाणी चालताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

जिनिलिया सध्या न्यूयॉर्कला गेली असून तिने न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया पायातील चप्पल हातात घेऊन रस्त्यावर अनवाणी चालत आहे. हा अनवाणी चालतानाचा व्हिडीओ शेअर करत तिने “न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी आणि का नाही? असं लिहिलं आहे.  

आणखी वाचा – “आमच्या बाबतीत हे घडलं असलं तरी…”, दोन लग्न करण्यावर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे भाष्य, म्हणाली, “चुकीचा निर्णय…”

जिनिलियाने चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. घर, संसार, मुलं सांभाळण्यात ती रमली होती. मात्र तिने तिच्या इच्छेनुसार हा पर्याय निवडला होता. कामाबरोबरच तिने तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. जिनिलियाची हीच खासियत सगळ्यांना आवडते. इतकंच नव्हे तर जिनिलिया इतर धर्माची असूनही ती मराठी संस्कृतीही तितकीच जपते. त्यामुळे तिच्या स्वभावाचे नेहमीच कौतुक होतं.

आणखी वाचा – हृता दुर्गुळेचे वेबविश्वात पदार्पण, ‘मन उडू उडू झालं’ फेम ‘या’ अभिनेत्यासह पुन्हा एकदा एकत्र करणार काम, अभिनेत्यानेच दिली माहिती

विलासराव देशमुख यांची सून, अभिनेता रितेश देशमुखची पत्नी तसेच दाक्षिणात्य, हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी जिनिलिया देशमुखने तिच्या ‘वेड’ चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. त्यामुळे आता  जिनिलिया तिच्या कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? यांची सर्वांना उत्सुकता आहे.

Tags: bollywood actressentertainment newsgenelia deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Nitish Bhaluni

'तारक मेहता…'मधील टप्पू एका एपिसोडमागे किती कमावतो?, पहिल्या अभिनेत्यापेक्षा आहे अधिक मानधन, रक्कम तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.