शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भुवनेश्वरी-अक्षरा येणार समोरासमोर, उत्तराला प्रत्युत्तर मिळणार अन्…; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्येही वाढली उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 4, 2024 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula shikvin Changalach Dhada Serial Promo

Video : भुवनेश्वरी-अक्षरा येणार समोरासमोर, उत्तराला प्रत्युत्तर मिळणार अन्...; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्येही वाढली उत्सुकता

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अक्षरा व अधिपती यांच्यातील वाद कमी होताना पाहायला मिळत आहे. तर अक्षराही अधिपतीच्या घरी राहायला आलेली आहे. तर एकीकडे अक्षरा अधिपतीच्या घरी आल्यानंतर भुवनेश्वरी खूप खुश असते. भुवनेश्वरी आता अक्षराचा सूड उगवण्यासाठी तयारी करत असते. मात्र आता भुवनेश्वरीचा प्रत्येक डाव अक्षरा ओळखून असते. तीदेखील आता तिला यावर उत्तर देण्यासाठी तयार असते. (Tula shikvin Changalach Dhada Serial Promo)

नुकताच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अक्षरा व भुवनेश्वरी समोरासमोर आलेल्या दिसत आहेत. या प्रोमोमध्ये भुवनेश्वरी असं बोलताना दिसत आहे की, “आता लय झाले छोटे छोटे वार, आता आम्ही मोठा वार करणार”. हे एकूण अक्षरा बोलताना दिसते की, “आता मी तुमची प्रत्येक चाल हाणून पाडणार. तुमच्या शहला काठशह देणार. कारण आता लढाई समोरासमोर होणार”, असं बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – “आपण नव्याने सुरुवात करुया?”, सागर मुक्ताची माफी मागणार, सावनीमुळे दोघांच्या नात्यात दुरावा, मालिकेत पुढे काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचा मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत असे सीन दाखवण्याकडे भर देण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकाऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “भारीच ,खरं तर हे खूप आधीच अपेक्षित होत पण ठीक आहे. आता असेच ट्रॅक कायम ठेवा फार मजा येईल आणि टीआरपी ही वाढेल”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने गरोदरपणामध्ये पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, डोहाळे जेवणाच्या संपूर्ण कार्यक्रमाचीही दाखवली झलक, म्हणाली, “खास क्षण…”

तर एकाने या प्रोमोवर कमेंट करत असं म्हटलं आहे की, “प्रोमोमध्ये किती मस्त शॉट दाखवला आहे. सीनचा खूप मस्त फील येत आहे”. तर एका चाहत्याने, “अक्षरा-अधिपती यांचं प्रेम दाखवा”, असं म्हटलं आहे. आता मालिकेच्या या प्रोमोने मालिकेत नेमकं काय होणार याची उत्सुकता वाढविली आहे.

Tags: marathi serialTula shikvin Changalach DhadaTula shikvin Changalach Dhada Serial Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Choreographer Ashish Patil started a new dance studio video shared on social media

Video : अभिमानास्पद! आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, मराठी कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक, म्हणाला, "स्वप्न होतं ते..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.