Amol Naik Baby Ceremony Post : मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम आहे. मालिकेतील राणादा, अंजलीबाई आणि वहिनीसाहेब यांसारख्या भूमिका आजही रसिकांच्या चर्चेत असतात. मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक कलाकारांनीही या मालिकेला वेगळी उंची दिली. त्यापैकी राणादाचा जिवलग मित्र ‘बरकत’ ही भूमिका साकारणारा अभिनेता अमोल नाईक सध्या खास कारणामुळे चर्चेत आला आहे.
अमोलच्या घरी ४ डिसेंबर २०२५ रोजी चिमुकलीचं आगमन झालं. सोशल मीडियावर तो नेहमीच आपल्या भावना व्यक्त करताना दिसतो आणि यावेळीही त्याने चाहत्यांसोबत खास आनंदाची बातमी शेअर केली. नुकताच त्याच्या लेकीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मराठी कलाविश्वातील काही जवळचे कलाकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. या खास क्षणांचा व्हिडिओ अमोलने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून त्यासोबत भावूक कॅप्शन लिहित लेकीच्या नावाची घोषणा केली.
आणखी वाचा – सलीम खान यांची प्रकृती आता कशी?,सलग चौथ्या दिवशीही ICU मध्ये घेत आहेत उपचार, डॉक्टर म्हणाले…
अमोलने आपल्या लाडक्या लेकीचं नाव ‘अक्षया’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे, अक्षया देवधर हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाई ही भूमिका साकारली होती. अमोल, अक्षया आणि हार्दिक जोशी यांची मैत्री मालिकेनंतरही कायम आहे. आपल्या जिवलग मैत्रिणीच्या नावावरूनच लेकीचं नामकरण केल्यामुळे चाहत्यांकडून अमोलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नामकरण सोहळ्याला मालिकेतील सहकलाकारांसह अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही विशेष उपस्थिती लावली होती. तसेच अभिनेत्री स्वाती लिमये हिचीही उपस्थिती पाहायला मिळाली. पडद्यावर दिसलेली मैत्री प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच घट्ट आहे ही या सोहळ्यातून समजलं. अमोल नाईकच्या लेकीच्या बारशाचा हा आनंदसोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून चाहत्यांकडून छोट्या ‘अक्षया’वर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर





