प्रत्येक वाहिनीवर नवीन मालिका येत असतात, जात असतात. पण काही मालिका या खूप कमी वेळातच प्रसिद्धी मिळवतात. अशीच अल्पकालावधीत प्रसिद्ध झालेली मालिका “तू तेव्हा तशी” ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हे या मालिकेत मुख्य पात्र साकारत होते. या मालिकेच्या निमित्ताने या दोघांनी बऱ्याच कालावधी नंतर मालिकाविश्वात पदार्पण केले. (Tu Tevha Tashi)
मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने या मालिकेत काम करत असलेल्या कलाकारांनी काही भावनिक पोस्ट शेअर केल्या. स्वप्नील जोशी ने मालिकेच्या शेवटच्या शूटचा एक व्हिडियो त्याच्या इंस्टाग्रामला शेअर केलेला असून त्यावर त्याने “शेवट सोप्पा नसतो” आज रात्री T3 संपत असताना, या शोचा शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. ते तांत्रिकदृष्ट्या कठीण होते म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभे राहून त्याची साक्ष देत अश्रू ढाळत होते. आनंदाश्रू. उबदार अश्रू. आपण तयार केलेले बंध आणि यशस्वी धावपळीत आनंदाश्रू! आमचे संपूर्ण युनिट. सर्वांचे डोळे पाणावले होते.
हे देखील वाचा- अशोक मामांना जीवनगौरव, पण लक्ष्याच्या आठवणीत फॅन्स भावुक
काय आहे कलाकारांची पोस्ट(Tu Tevha Tashi)
आम्ही आमच्या कामाला कौटुंबिक प्रकरण म्हणतो! आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकत्र प्रेम करतो. आणि आम्ही वैयक्तिकरित्या पुढे जात असलो तरीही आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू! रंगदेवता आपल्यावर सदैव प्रसन्न राहो ! शुभम !!!धन्यवाद ऑफिस गँग, दि लाइट बॉईज, द स्पॉट बॉयज, प्रोडक्शन टीम, डायरेक्शन टीम, मेकअप आणि हेअर टीम, ड्रेस टीम, आर्ट टीम! आणि या स्वप्नाच्या प्रवासाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रत्येकजण जोडलेला आहे. ता.क.:- माझ्या पाठीशी असलेल्या माझ्या संघाला मिठी मारतो!असे कॅप्शन देत संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. (Tu Tevha Tashi)

याचबरोबर अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिने सुद्धा तिच्या इंस्टाग्रामवर “तू तेव्हा तशी” मालिकेच्या संपूर्ण टीमचा फोटो शेअर करत “There will never be goodbyes ! Togetherness will be the reason to celebrate ! More pictures to follow “असे कॅप्शन दिले आहे. तसेच मालिकेत वल्ली हे नेगीटिव्ह पात्र अभिज्ञा भावे हिने साकारलं होत, तिने तिच्या इंस्टाग्रामवर वल्ली या पत्राचा एक फोटो शेअर करून त्यावर “valli is a character that doesn’t happen on television always, I am glad you happened to me Will miss u Valli!!! असे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा- गर्भवती अभिनेत्रीला धो धो पाऊसात ही निळू फुलेंनी केली होती मदत