असा नट होणे नाही म्हणणारं दिग्गज सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांना झी चित्र गौरव कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा हा सन्मानपूर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. अभिनेता सिद्धार्थ जाधव ने अशोक मामांना दिलेली मानवंदना डोळे दिपवणारी होती. (Ashok Saraf Laxmikant Berde)
यंदाच्या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे मानकरी दिग्गज सिनेअभिनेते आणि आपल्या सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ हे ठरले. अर्थात एक काळ आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या या अभिनेत्याबद्दल बोलावं तितकं कमीच. नशिबाच्या हवाल्यावर मी इथवर आलोय असे नेहमीच म्हणणारे अशोक सराफ हे त्यांच्या नशिबावर इथवर आलेच असतील मात्र त्यांच्यातील कलागुणांनी त्यांचा हा प्रवास इथपर्यंत आणायला सज्ज केलाय.

तर हा पुरस्कार स्वीकारताना व्यासपीठावर नेण्यासाठी अशोक सराफ यांच्यासोबत एक काळ गाजवलेले अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेते महेश कोठारे होते. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. दरम्यान या व्हिडिओला आलेल्या एका कमेंटने लक्ष वेधून घेतलंय.
आणि चाहते म्हणाले (Ashok Saraf Laxmikant Berde)
एका युजरने लिहिलंय, ‘अशोक मामांसारखा नट होणे नाही खर आहे पण स्टेज वर जाताना अशोक मामा, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांच्या सोबत लक्ष्या असायला हवा होता’ या कमेंटने खऱ्या अर्थाने व्हिडिओचं पारडं जड केलंय. अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर या चार मित्रांच्या मैत्रीचं आजही आवर्जून उदाहरण दिल जात. या चौघांची मैत्री अतूट होती आणि कायम असेल यांत वादच नाही. अशोक मामांना मिळणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यान लक्ष्याची कमतरता नक्कीच जाणवतेय.(Ashok Saraf Laxmikant Berde)
====
====
यंदाच्या झी चित्र गौरव या सोहळयाला अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडवला. त्यांना सिद्धार्थने एका वेगळ्या अंदाजात दिलेली ही मानवंदना वाखाणण्याजोगी आहे. या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांनीही सिद्धार्थचे टाळ्यांच्या स्वरूपात कौतुक केले. सिद्धार्थची ही कृती पाहून अलका कुबल, महेश कोठारे, जयवंत वाडकर, सचिन पिळगांवकर, मृणाल कुलकर्णी यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले.