कलाकार कायमच आपल्या सह कलाकारांसोबत एक वेगळं बॉण्डिंग शेअर करतात. कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती ते त्यांच्या सोशल मीडियावरून बरेचदा शेअर करत असतात. आणि त्यांचं हे बॉण्डिंग बघायला प्रेक्षकांना कायमच आवडत. अशीच एक धमाल जोडी म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांची.झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या ही जोडी पहायला मिळते. (Titeekshaa Tawde Aishwarya Narkar)
या मालिकेत त्या नायिका आणि खलनायिका या रूपात बघायला मिळतात.या मालिकेत तितिक्षा नेत्रा ही नायिकेची भूमिका साकारते आहे. तर ऐश्वर्या रुपाली नावाची खलनायिका साकारत आहेत. नेत्राला या मालिकेत एक विशेष शक्ती मिळालेली आहे. ज्यामुळे पुढे काय घडणार आहे हे तिला आधीच कळते. सध्या मालिकेत रुपाली इंद्राणींनाच्या मदतीने नेत्राचा काटा काढण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच प्रकट दिनाच्या दिवशी नेत्राच्या विरुद्ध त्यांनी कारस्थान रचले आहे. परंतु त्या आधी इंद्राणीने रुपालीला एक अट घातली आहे की, प्रकट दिनाच्या आधी त्रिनयना देवीचा ग्रंथ तिच्या कडे आहे याचा पुरावा तिने इंद्राणीला द्यायचा. आता प्रकट दिनाच्या दिवशी या दोघी काय खेळी खेळणार आहेत हे बघणं रंजक ठरणार आहे.
पाहा तितिक्षाने काय चोरी केले? (Titeekshaa Tawde Aishwarya Narkar)
परुंतु पडद्यामागे तितिक्षा आणि ऐश्वर्याचा बॉण्डिंग फार कमाल आहे. एकमेकींसोबतचे व्हिडिओज फोटोज त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच एक मजेशीर फोटो तितिक्षाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वरून शेअर केला आहे. त्यात तिने असं कॅप्शन लिहलं आहे की, स्टीलिंग लिपस्टिक फ्रॉम ऐश्वर्या नारकरज व्हॅनिटी.तिने या स्टोरी मध्ये प्रेक्षकांचं मत देखील विचारलं आहे. ही लिपस्टिक वापरून तितिक्षाने जो लुक तयार केला आहे तोही छान वाटत आहे. (Titeekshaa Tawde Aishwarya Narkar)

हे देखील वाचा : जवादे कुटुंबाला मिळाली सून ? प्रसादच्या कॅप्शनने वेधले लक्ष
तितिक्षा तिच्या वेगेगळ्या फोटोशूट्स साठी देखील चर्चेत असते. तिचे आणि ऐशवर्यांचे बॅकस्टेज मजेशीर रील बघणं देखील रंजक ठरत. तर ऐश्वर्या नारकर सध्या बरेच लूक्स ट्राय करत आहेत. त्यांच्या या अदांची प्रेक्षकांना आजही भुरळ पडते. तसेच या वयातही त्या कमालीच्या फिट आहेत त्यांचे योगाचे अनेक फोटोज त्या प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात.तितिक्षा आणि ऐश्वर्या यांच्या बॉंडिंगमुळे ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.