अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके यांच्या नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या लग्नसोहळ्यात फोटो समोर आला असून ही जोडी विवाहबंधनात अडकली असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठमोळ्या व पारंपरिक अंदाजात दोघांनी त्यांचा विवाहसोहळा उरकला आहे. दरम्यान, दोघांचा त्यांचा लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे. सिद्धार्थच्या एका मित्राने लग्न लागल्यानंतर दोघांबरोबरचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे. यांत दोघेही नववधूवराच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. अखेर सिद्धार्थ व तितीक्षाने सात फेरे घेत लगीनगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Updates)
नववधूवराच्या लूकमध्ये सिद्धार्थ व तितीक्षा खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊज परिधान केला. तर ऑफ व्हाईट कलरच्या शेरवानीमध्ये सिद्धार्थचा लूक खूपच उठून दिसला. एकमेकांना वरमाला घातल्यानंतरचा त्यांचा हा एकत्र फोटो खूपच सुंदर दिसला. सिद्धार्थ व तितीक्षाच्या चेहऱ्यावर आनंदही पाहायला मिळला. वरमाला घालताना तितीक्षाला अश्रूही अनावर झालेले पाहायला मिळाले.
अखेर प्रेक्षकांची ही लाडकी जोडी लग्नबंधनात अडकत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात तितीक्षा व सिद्धार्थ यांनी लग्न केले. थेट केळवणाचे फोटो शेअर करत सिद्धार्थ व तितीक्षा यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली. बऱ्याच वर्षांपासून तितीक्षा व सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं, आणि त्यानंतर अखेर आज दोघांनी लगीनगाठ बांधली. दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाचं एक पाऊल टाकलं आहे.
सिद्धार्थ व तितिक्षाच्या लग्नाआधीच्या विधींच्या फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दोघांच्या हळदी समारंभालाही जवळचे नातेवाईक व कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. सिद्धार्थ-तितीक्षासह कलाकार मंडळींनीही दोघांच्या हळदीत थिरकताना दिसले. तसेच दोघांच्या साखरपुड्याचेही खास फोटो समोर आले. यांत दोघांचा मॉडर्न व रोमँटिक अंदाज विशेष भावला.