अभिनेता तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेला हनुमान हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरपूर कमाई करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत ‘हनुमान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात झाला आहे. हा चित्रपट महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण अखेरीस या काल या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी मुहूर्त सापडला आहे.
१६ जानेवारी म्हणजेच काल हा चित्रपट ओटीटी माध्यमावर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. झी-५ वर इंग्रजी सबटायटल्ससह हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित झाला आहे. हनुमान हा चित्रपट जिओ सिनेमावरही दिसत आहे. जिओ सिनेमावर हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषेत नाही. या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट हिंदीत इंग्रजी सबटायटल्ससह पाहू येऊ शकतो. शनिवारी संध्याकाळी ८ वाजता कलर्स सिनेप्लेक्सवर या चित्रपटाचा प्रीमियरही झाला आहे.
Brahmaand ka sabse pehla SUPERHERO ab aayega aapke TV screens par! ????????
— Prasanth Varma (@PrasanthVarma) March 8, 2024
16 March raat 8 baje, dekhiye #HanuMan ka World Television Premiere, Hindi mein pehli baar, Colors Cineplex aur JioCinema par.@tejasajja123 @Actor_Amritha @Primeshowtweets @RKDStudios @Colors_Cineplex… pic.twitter.com/0Uq7qg6Efh
दिग्दर्शक प्रशांत वर्माचा सुपरहिरो आधारीत ‘हनुमान’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिनेता तेजा सज्जाची भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटातील व्हीएफक्स आणि इतर तांत्रिक बाबींचेही कौतुक झाले होते. चित्रपटगृहांमध्ये कमाल दाखवल्यानंतर आता हनुमान चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांमध्ये व प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण ज्यांना काही कारणास्तव हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघता आला नव्हता, ते हा चित्रपट आता ओटीटीवर घरबसल्या पाहू शकतात.
दरम्यान, हनुमान चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. अशातच आता ओटीटीद्वारेही हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहे.