शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुंदर स्वयंपाकघर, प्रशस्त हॉल अन्…; लग्नानंतर नवऱ्यासह राहत असलेलं तितीक्षा तावडेचं घर आहे इतकं स्वच्छ व आकर्षक, Inside Video

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2024 | 9:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Titeeksha Tawde and Siddharth Bodke Home

सुंदर स्वयंपाकघर, प्रशस्त हॉल अन्...; लग्नानंतर नवऱ्यासह राहत असलेलं तितीक्षा तावडेचं घर आहे इतकं स्वच्छ व आकर्षक, Inside Video

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमुळे अभिनेत्री तितीक्षा तावडेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे म्हणजे नेत्रा व अद्वैत या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. तर ऐश्वर्या नारकर यांच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकूणच या रहस्यमय अशा कथेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेमुळे नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा चर्चेत आली. तितीक्षाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Titeeksha Tawde and Siddharth Bodke Home)

सोशल मीडियावरही तितीक्षा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्य्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वी तितीक्षा तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नामुळे चर्चेत आली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. तितीक्षा व सिद्धार्थ यांनी अगदी शाही थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नानंतर तितीक्षा सिद्धार्थसह राहत असून तिच्या नव्या घराची झलक तिच्या एका व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “आता विषय हार्ड”, कोल्हापूरी भाषेत अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली देताच प्रेक्षकांनाही भलताच आनंद, म्हणाले, “अखेर दोघं…”

तितीक्षाने तिच्या युट्युब चॅनेलवरुन तिच्या माहेरच्या घराची झलक दाखविली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच लेक व जावई घरी आल्याने तितीक्षाच्या आई-बाबांनी दोघांचं अगदी जंगी स्वागत केलं. याशिवाय तितीक्षाने तिच्या रोजच्या जीवनक्रमाविषयी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तितीक्षा सध्या राहत असलेल्या घराची झलक पाहायला मिळाली.

आणखी वाचा – महेश मांजरेकरांच्या लेकाला पाहिलंत का?, आता बदलला आहे लूक, हॉटेल सांभाळत जिममध्ये करत आहे मेहनत, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये तितीक्षाच घर पाहायला मिळालं असून ते अगदी नीटनेटकं आहे. तितीक्षाने तिचं घर सजवलं असून अगदी सुटसुटीत ठेवलं आहे. विठ्ठल-रुक्मिणीची मूर्तीही त्यांच्या लिव्हींगरुममध्ये दिसत आहे. तर त्याशेजारी दोघांची फोटोफ्रेम पाहायला मिळत आहे. शिवाय लिव्हिंग रुममधील लॅम्पने लक्ष वेधलं आहे. चप्पल ठेवण्यासाठी त्यांनी खास खणही तयार करुन घेतला आहे. याशिवाय अत्यंत साधं असं किचन ही पाहायला मिळालं. किचनमधील पाण्याच्या माठाने साऱ्यांचं लक्ष वेधलं. आजकाल फार कमी घरांमध्ये माठ पाहायला मिळतं.

Tags: entertainmentmarathi serialTiteeksha TawadeTiteeksha Tawade And Siddharth BodkeTiteeksha Tawde and Siddharth Bodke Home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Paru fame Sharyu Sonawane, Purva Shinde and Prasad Jawade danced on the song angaaron Sa from Pushpa-2 video viral

Video : पारू, आदित्य व दिशा यांचा 'पुष्पा-२'च्या ‘अंगारो सा…’ गाण्यावर भन्नाट डान्स, सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.