शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 10, 2025 | 5:11 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Soldier Viral Video

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

Soldier Viral Video : सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल शिकवण्याची शपथ घेतली. या दहशवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची आखणी केली. आणि ही मोहीम फत्ते केली. त्यानंतर आता पाकिस्तानही पेटून उठलं असून पाकिस्तानी सैन्याने भारतावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. यावर भारतही चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिक मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहेत. भारतीय सैनिक जीवाचे रान करुन सीमारेषेवर लढा देत आहेत. डोळ्यांत तेल टाकून अहोरात्र जागरण करुन ही भारतीय सेना भारताचे नाव रोशन करण्यात लागली आहे.

या युद्धजन्य परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर सध्या आपल्या सैनिक बांधवांचे भावुक करुन सोडणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जवानांची सुट्टी रद्द करत त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले. यामुळे या सैनिक बांधवांच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आसवं दिसली. देशसेवेसाठी जाणारा हा आपला माणूस पुन्हा परतेल की नाही ही भीती प्रत्येकाच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसली. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, एका सैनिक बांधवांच्या व्हिडीओमधील एक व्हिडीओ साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे.

आणखी वाचा – शेवटचा व्हिडीओ कॉल, मजुरी करणारे वडील अन्…; अवघ्या विशीत वीरमरण आलेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचा टाहो, एकुलता एक लेक आणि…

https://www.instagram.com/reel/DJdT5dLomj9/?utm_source=ig_web_copy_link

हा जुना व्हिडीओ असून marathi speaker या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकली जवानांच्या पाय पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून त्या चिमुकलीवरील संस्कारांची अनुभूती येते. समोर असलेल्या व्हिडीओमध्ये काही जवान उभे असतात त्यावेळेला एक चिमुरडी त्यांच्या दिशेला धावत जाताना दिसते. तिला पाहून एक जवान तिची विचारपूस करणार इतक्यात ती चिमुरडी खाली वाकत जवानाच्या पायाला स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेते. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या जवानाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येते.

आणखी वाचा – मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

पुढे ती चिमुरडी धावत परत येत असताना मध्येच थांबते आणि मागे वळून त्या जवानांना सॅल्यूट करते. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. सदर व्हिडीओ पाहता नेटकरी त्या चिमुरडीवरील संस्कारांचं कौतुक करताना दिसत आहेत. अर्थात, त्या मुलीच्या कृतीने संबंध भारत वासियांची मन जिंकली आहेत.

Tags: indian armySoldier Viral Videoviral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Hina Khan Received Threats

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, "सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.