रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली ‘सातव्या मुलीची…’ फेम तितीक्षा तावडे, जावयाचं सासू-सासऱ्यांकडून जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Titeeksha tawde and siddharth bodke

Video : लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली 'सातव्या मुलीची...' फेम तितीक्षा तावडे, जावयाचं सासू-सासऱ्यांकडून जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली. आजवर तितीक्षाने या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेमुळे तितीक्षाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वीच तितीक्षा तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. ६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा व सिद्धार्थ यांचा अगदी शाही थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सिद्धार्थ व तितीक्षा यांनी डेस्टिनेशन वेडिंग करत त्यांचा विवाहसोहळा उरकला. (Titeeksha tawde and siddharth bodke)

लग्नानंतर तितीक्षाने लगेचच कामाला सुरुवात केली. त्यानंतर आता लग्नाला तीन महिने पूर्ण होताच तितीक्षा तिच्या माहेरी गेली आहे. लग्नानंतर ती नवऱ्यासह पहिल्यांदाच माहेरी गेली आहे. तितीक्षाच घर हे डोंबिवलीत आहे. तितीक्षा घरी पोहोचताच तिच्या आईने दोघांचं औक्षण करत त्यांचं स्वागत केलं. त्यांनतर त्यांनी त्यांच्या घरातल्या देवांचे दर्शन घेतले.

आणखी वाचा – Video : सासू-सासरे व नवऱ्याने मृण्मयी देशपांडेला दिलं जबरदस्त सरप्राइज, अभिनेत्री भारावून गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

तितीक्षा व सिद्धार्थ ज्या दिवशी घरी गेले त्या दिवशी संकष्टी होती. त्यामुळे तिचे आई-बाबा दोघेही जेवण बनवताना दिसले. यावेळी तितीक्षाच्या आई-बाबांनी गोडाधोडाचे पदार्थ केले होते, मोदकही बनवण्यात आले होते. सगळ्यांनी मिळून पोटभर जेवण केलं. त्याच दिवशी आयपीएलची मॅच असल्याने तितीक्षा, सिद्धार्थ आणि तिचा भाऊ यांनी मिळून मॅच पाहिली. त्यानंतर तितीक्षाच्या आई-बाबांनी लग्नानंतर घरी पहिल्यांदाच औक्षण करत दोघांना भेटवस्तूही दिली.

आणखी वाचा – जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष

दुसऱ्या दिवशी तितीक्षाच्या आईचा वाढदिवस होता. मात्र चित्रीकरणामुळे तिला येता येणार नव्हतं. त्यामुळे तितीक्षाने आईचा वाढदिवस आदल्या दिवशीच साजरा केला. यावेळी तितीक्षाच्या माहेरच्या घराची झलक पाहायला मिळाली. अत्यंत साधे राहणीमान यावेळी पाहायला मिळालं. त्यांच्या लिव्हींगरुममध्ये तितीक्षा व खुशबूच्या लहानपणीचे फोटोही लावलेले दिसले. कोणताही अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधे असे तितीक्षाचे माहेरचे घर पाहणं साऱ्यांना भावलं.

Tags: marathi actresstiteeksha tawdeTiteeksha Tawde And Siddharth Bodketiteeksha tawde mothers home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
30 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

‘कर्क’ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार बढती, तर ‘सिंह’ राशीच्या लोकांची व्यवसायात होणार भरभराट, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.