सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कर्क’ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार बढती, तर ‘सिंह’ राशीच्या लोकांची व्यवसायात होणार भरभराट, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
30 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

‘कर्क’ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार बढती, तर ‘सिंह’ राशीच्या लोकांची व्यवसायात होणार भरभराट, जाणून घ्या…

मेष : प्रवासातुन लाभ होईल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यापार उद्योगात वाढ होईल. मोठे आर्थिक लाभ होतील.

वृषभ : आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात संबंधात स्नेह निर्माण होईल.

मिथुन : व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. आज दैवी पाठबळ लाभणार नाही. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापारात नुकसान संभवण्याची शक्यता आहे. प्रकृती आस्थिर राहणार आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कर्क : नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. काहीना बढती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धि होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही या विषयी काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून फायदा होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

सिंह : नोकरीत वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. याकडे लक्ष द्यावे. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताणतणाव वाढण्याचे योग आहेत. शत्रुपक्ष वरचढ होण्याची शक्यता आहे.

कन्या : आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्यार्थी विद्याभ्यासात प्रगती करतील.

तूळ : काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरीत बढतीची शक्यता राहील. राजकिय सामाजिक आपली प्रतिष्ठा ढासळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यावर खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. संतती सौख्य उत्तम राहिल. शेअर्समधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कर्जाची मागणी मंजुर होईल.

धनु : नोकरीत खुप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याविरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची संभावना आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल.

मकर : व्यापारात विरोधक आक्रमक होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्र-मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक वाढेल. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन सावकाश चालवा. नव्या योजनाना चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.

कुंभ : बढतीची शक्यता आहे. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. अधात्मशास्त्राकडे कल राहील. वैवाहिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीन : आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

Tags: 30 May Horoscope NewsHoroscope Marathi NewsToday's Horoscope News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
esha deol on amisha patel

ईशा देओलने अमीषा पटेलला म्हंटलं खोटारडी, दोघींमध्ये जोरदार भांडण, म्हणाली, “रडत बसली आहे अन्...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.