रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
makarand deshpande new movie

जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील काही महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील चर्चेत असलेले पाहायला मिळाले. अन्न, पाणी वर्ज्य करत बेमुदत ते केवळ समाजाच्या हक्कासाठी लढत राहिले. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही हा त्यांचा पण आहे. आंदोलनादरम्यान प्रकृती ढासळली, त्यांना उभंही राहता येत नव्हतं. मात्र अशा या कठीण परिस्थितीत ते न डगमगता ते कायम मराठ्यांच्या हक्कासाठी लढत राहिले. (makarand deshpande new movie)

अशातच या महान व्यक्तिमत्त्वावर आधारित एक नवाकोरा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होतं आहे. ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा नवा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर समोर आला आहे. या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “कर्म मराठा, धर्म मराठा. मराठ्यांचा नवीन सरदार”, या संवादाने सुरु झालेल्या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे यांनी साकारली आहे.

आणखी वाचा – अधिपतीच्या वाढदिवसाला अक्षराने औक्षण करत दिलं सरप्राइज गिफ्ट, नवऱ्याचा लूकच बदलला, प्रेमाची कबुलीही देणार

मकरंद देशपांडे हे रंगभूमी तसेच रुपेरी पडद्यावरील नावाजलेले कलाकार आहेत. याशिवाय त्यांनी लेखक, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका पेलवल्या आहेत. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. मराठीसह त्यांनी हिंदी, साऊथ चित्रपटसृष्टीतही भूमिका साकारली. यानंतर आता मकरंद एका नव्या चित्रपटातून मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाले आहेत.

आणखी वाचा – सायली-अर्जुनने केला साक्षीचा पर्दाफाश, कोर्टात पुराव्यानिशी केलं सिद्ध, विलास गोळीबारप्रकरणात होणार अटक?

मकरंद अनासपुरे हे ‘आम्ही जरांगे’ या चित्रपटात जरांगे पाटील यांची भूमिका साकारताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या टीझरमध्ये ते पाहायला मिळाले. अगदी हुबेहूब जरांगे पाटील यांसारखा वेष करत ते रस्त्यावर उतरून समाजसेवा करताना दिसले. गरजूंना मदत करताना दिसले. हा टिझर पाहून मकरंद यांना चित्रपटात पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

Tags: amhi jarangeentertainmentmakarand deshpandemakarand deshpande new moviemarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Mrunmayee Deshpande Birthday Gift

Video : सासू-सासरे व नवऱ्याने मृण्मयी देशपांडेला दिलं जबरदस्त सरप्राइज, अभिनेत्री भारावून गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.