रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सासू-सासरे व नवऱ्याने मृण्मयी देशपांडेला दिलं जबरदस्त सरप्राइज, अभिनेत्री भारावून गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2024 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande Birthday Gift

Video : सासू-सासरे व नवऱ्याने मृण्मयी देशपांडेला दिलं जबरदस्त सरप्राइज, अभिनेत्री भारावून गेली अन्...; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावरही मृण्मयी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विशेषतः मृण्मयीचे तिच्या बहिणीबरोबरचे म्हणजेच गौतमीबरोबरचे अनेक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. याशिवाय मृण्मयी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्याही अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. मृण्मयी तिचा नवरा स्वप्नील राव बरोबरचेही अनेक व्हिडीओ शेअर करत असते. (Mrunmayee Deshpande Birthday Gift)

अशातच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आज मृण्मयीचा वाढदिवस आहे. मृण्मयीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्याने हा व्हिडीओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तिला भेटवस्तूही दिली आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आमच्या जीवनात संगीत असू दे. तुम्हाला जगातील सर्व आनंद मिळोत. मी तुझ्यावर प्रेम करतो”, असं म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “मला मुस्लिम बनायचं नाही”, शाहरुख खानच्या पत्नीचं ‘ते’ विधान पुन्हा एकदा चर्चेत, म्हणालेली, “धर्म बदलणार नाही कारण…”

View this post on Instagram

A post shared by Swapnil Rao (@swapnilrao11)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मृण्मयीला तिच्या सासरच्या मंडळींनी तिला खास सरप्राइज देत भेटवस्तू दिली आहे. या व्हिडीओवरुन असं समोर आलं आहे की, मृण्मयीची इच्छा असलेली सतार तिला भेटवस्तू म्हणून मिळाली आहे. शाळेत असल्यापासून मृण्मयीला सतार वाजवायची आवड होती. थेट मिरज वरून बनवून घेतलेली त्यावर मृण्मयीच नाव लिहून घेतलेली ही खास सतार आहे. ही भेटवस्तू पाहून मृण्मयीला खूप भारावून आलं. ती अतिशय आनंदात असलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष

मृण्मयी नेहमीच तिच्या फार्महाऊसमधीलही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्निल राव या दोघांनी मिळून महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात एक छोटसं घर बांधलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या ‘ड्रीम होम’चा फोटोही शेअर करत असते. त्यानंतर दोघांनी त्यांच्या या फार्महाऊसवर शेती करण्यास सुरुवात केली. स्वत:साठी लागणाऱ्या भाज्या-फळभाज्यांचे उत्पादन याठिकाणी ते घेतात.

Tags: marathi actressmrunmayee deshpandeMrunmayee Deshpande Birthday GiftMrunmayee Deshpande Husband
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Pushpa 2 song bts

Pushpa 2 चित्रपटाच्या जबरदस्त गाण्याचा BTS व्हिडीओ समोर, प्रेक्षकांचाही मिळत आहे तुफान प्रतिसाद, अल्लु अर्जुन-रश्मिकाचा नवा अंदाज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.