‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अल्पावधीतीच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रेक्षक या मालिकेला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. या मालिकेत शिवानी सुर्वे व समीर परांजपे ही जोडी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. दोघांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. समीरच्या अभिनयावर व भूमिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. (Sameer Paranjape New Video)
समीरने याआधी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. यानंतर आता समीर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन मालिकांमध्ये परतला आहे. सोशल मीडियावरही समीर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये समीर त्याची लेक साचीबरोबर दिसत आहे.
समीर त्याच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत लेकीबरोबर क्वालिटी टाइम शेअर करत असतो. अशातच समीरने त्याच्या लेकीबरोबरचा एक गोड असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समीरची लेक साची त्याची दृष्ट काढताना दिसत आहे. बाप-लेकीचं हे अनोखं बॉण्ड साऱ्यांच्या पसंतीस पडलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत “काही दिवस आजी येऊन गेली की होणारा बदल. शास्त्र असतं ते”, असं कॅप्शन देत समीरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
यावरुन समीरची लेक तिच्या आजीच पाहून तिच्या बाबांची दृष्ट काढत आहे. हे पाहून समीर खूप आनंदी झाला आहे. समीर व साचीच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शिविली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर अनेक कलाकार मंडळींनी ही या व्हिडीओवर कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे.