गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आजोबांना टीव्हीवर बघून नातू खुश, अरुण कदमांच्या पत्नीने शेअर केला नातवाचा गोड व्हिडीओ  

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 1, 2024 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Arun Kadam's wife shared a cute video of grandson who is happy to see him on TV

Video : आजोबांना टीव्हीवर बघून नातू खुश, अरुण कदमांच्या पत्नीने शेअर केला नातवाचा गोड व्हिडीओ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ‘लाडका दादुस’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांवर वेगळीच छाप उमटवली आहे.  अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे हे अरुण कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या पत्नी, लेक व नातवाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

अरुण कदम हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. अशातच त्यांनी अरुण कदम यांच्या नातवाचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे महाराष्ट्रासह अवघ्या जगभरात अनेक चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते आहेत. अरुण कदम यांचा लहान नातूदेखील या शोचा खूप मोठा चाहता आहे आणि आजोबांना टीव्हीवर बघून नातवाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अरुण कदम यांनी नातवाचा हाच खास व्हिडीओ शेअर केला आहे. अरुण कदम नेहमीच लाडक्या नातवाबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच नातवाचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा शो बघतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vaishali Kadam (@mevaishali.kadam)

आणखी वाचा – “हिंदूत्वाशी गद्दारी…”, ‘धर्मवीर-२’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पोस्टर लॉंचला कलाकारांची हजेरी

अरुण कदम यांनीत्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नातवाचा हास्यजत्रा बघतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीव्हीवर अरुण कदम यांचे स्किट चालू आहे आणि त्यांना टीव्हीवर बघून नातू आनंदाने टाळ्या वाजवत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.    

आणखी वाचा – “तुझ्याशिवाय हा विजय…”, विराट कोहलीची पत्नीसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “हे यश…”

अरुण कदम हे  नेहमीच नातवाबरोबरचे काही खास व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्यांच्या या खास क्षणांना चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. आजोबा-नातवाचा हा खास बॉण्ड त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावतो. अशातच त्यांचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.   

Tags: arun kadammaharashtrachi hasyajatramarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Sankarshan Karhade himself revealed about the rejection of the judging of zee marathi Drama Juniors show.

‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेच्या नकाराचे कारण आले समोर, खुलासा करत म्हणाला, “मला दडपण होतं पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.