शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतःच्या लग्नात असा दिसत होता ‘तुला शिकवीन…’मधील अधिपती, साधेपणाने वेधलं लक्ष, पारंपरिक लूकलाच दिली होती पसंती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Hrishikesh Shelar Wedding Photo

स्वतःच्या लग्नात असा दिसत होता 'तुला शिकवीन…'मधील अधिपती, साधेपणाने वेधलं लक्ष, पारंपरिक लूकलाच दिली होती पसंती

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षक पसंती दर्शवित आहेत. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्यात प्रेम फुलताना पाहायला मिळत आहे. अधिपती व अक्षरा यांच्यातील फुलत जाणार प्रेम पाहणं प्रेक्षकांनाही रंजक ठरत आहे. दरम्यान, भुवनेश्वरीचा विरोध सारं चित्र बदलवताना दिसत आहे. अधिपती ही भूमिका मालिकेत अभिनेता हृषीकेश शेलार साकारत आहे. हृषीकेशने याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. (Hrishikesh Shelar Wedding Photo)

हृषीकेशच्या अधिपती या भूमिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय हृषीकेश ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. हृषीकेशने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावरही हृषीकेश बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषतः अधिपती त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

आणखी वाचा – पापलेट, कोळंबी मसाला अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी मच्छीवरही मारला ताव, अलिबाग ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sneha Ashok Mangal(KATE) (@sneha_ashokmangal14)

हृषीकेश नेहमीच त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो. हृषीकेश व स्नेहाच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. हृषीकेशच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे. हृषिकेशची पत्नी स्नेहा ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाचीही बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्नसोहळा उरकला. पारंपरिक अंदाजात ही जोडी विवाहबंधनात अडकली. हृषिकेश व स्नेहा यांच्या लग्नाची चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. स्नेहा काटे ही अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच अभिनेता हृषीकेश शेलारसह लग्नबंधनात अडकली.

आणखी वाचा – कुणाकडे शरीरसुखाची मागणी तर कुणाला वाईट स्पर्श, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव, धक्कादायक सत्य समोर

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Shelar (@hrishishelar)

गेल्यावर्षी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. हृषीकेश व स्नेहाने मागील वर्षी चाहत्यांशी गुडन्यूज शेअर केली. दोघांनी आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली. त्यांच्या लेकीचं नाव रुही असे आहे. स्नेहाने ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे.

Tags: hrishikesh shelarHrishikesh Shelar Wedding PhotoHrishikesh Shelar Wifemarathi actortula shikwin changlach dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Netra Gets Worried as She Hears the 'Vichitra Veena'

रुपालीसह नेत्रालाही ऐकू आली ‘विचित्र वीणा’, हा देवीआईचा शुभसंकेत असेल की आणखी काही?, विरोचक सावध

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.