आजकाल टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीला प्रेक्षकांची अधिक पसंती असलेली पाहायला मिळत आहे. नेहमीपेक्षा हटके विषय हे वेबसीरिजच्या माध्यमातून पहायला मिळतात. विविध विषय समोर आल्याने प्रेक्षकांचेही मोठ्या प्रमाणात मनोरंजन होते. येत्या कालावधीमध्ये अनेक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता मिर्झापूरचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीचे दोन्हीही भाग हिट झाले होते. या सीरिजमध्ये इंटीमेट सीन अधिक आहेत. यामुळे या सीरिजची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. अशाप्रकारच्या अजूनही काही सीरिज आहेत ज्यामध्ये असे इंटीमेट सीन अधिक प्रमाणात आहेत. (ott special webseries)
‘मिर्झापुर’चा पहिला व दुसरा सीजन मोठ्या प्रमाणात पसंत केला गेला. दोन्हीही सीजनमध्ये मारामारी, खून असे सर्वकाही पाहायला मिळतात. तिसऱ्या सीजनमध्येही असेच काहीतरी असणार आहे अशी चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील रसिका दुग्गलने तिच्यापेक्षा वयाने मोठे असणारे अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्याबरोबर इंटीमेट सीन दिले आहेत.
‘आश्रम’ ही वेबसीरिजही खूप लोकप्रिय आहे. यामधील बॉबी देओलचा अभिनय सगळ्यांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये त्रिधा चौधरीने बॉबी बरोबर अनेक रोमॅंटिक सीन दिले आहेत.
‘शी’ ही वेबसिरिजदेखील खूप हिट झाली. यामध्ये अदिती पोहनकरने मुख्य भूमिका केली आहे. तिने किशोर कुमारबरोबर अनेक रोमॅंटिक सीन दिले आहेत.

‘हरामखोर’ ही वेबसीरिजही मोठ्या प्रमाणात पसंत केली होती. यामध्ये श्वेता त्रिपाठी व नवाजुद्दीन सिद्दीकी हे मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये श्वेता व नवाजुद्दीन यांचे अनेक रोमॅंटिक सीन पाहायला मिळाले.

‘डर्टी पॉलिटिक्स’ ही वेबसीरिजदेखील अधिक चर्चेत आली. यामध्ये मल्लिका शेरावत व ओम पुरी यांचे जबरदस्त रोमॅंटिक सीन पहायला मिळाले. या वयातही ओम पुरी यांनी दिलेले सीन पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.