बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अप्पी आमची कलेक्टर’मधील सिंबाच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचीही मालिकेत भूमिका, लेकाबरोबर ‘त्या’ सीनेमध्ये दिसले, कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector serial Simba aka Sairaj Kendre’s father plays the role of a kidnapper.

'अप्पी आमची कलेक्टर'मधील सिंबाच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचीही मालिकेत भूमिका, लेकाबरोबर 'त्या' सीनेमध्ये दिसले, कौतुकाचा वर्षाव

छोट्या पडद्यावर सध्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका तुफान गाजत आहे. लीप घेतल्यापासून ही मालिका लोकप्रियतेच्या अव्वल स्थानावर आहे. सध्या या मालिकेत अर्जुन व अप्पी यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अर्जुन व अमोल यांची भेट कधी होणार? याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता ही उत्सुकता पूर्ण होणार आहे. कारण अर्जुनला त्याचा मुलगा कोण आहे? हे कळणार आहे.

त्यामुळे अमोलला आता त्याचा बाबा मिळणार आहे. अमोल व अर्जुन हे दोघे आता बाप-लेक म्हणून समोर येणार आहेत. नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अमोल किडनॅप झाला असून त्याला वाचवण्यासाठी अर्जुन येणार आहे. या मालिकेत अमोलला ज्या किडनॅपरने किडनॅप केले आहे, तो खऱ्या आयुष्यात अमोल म्हणजेच साईराजचा खरा बाबा आहे. या मालिकेतून त्यांनी आपल्या लेकासह अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे आता एकीकडे सिंबाची त्याच्या रील वडिलांची भेट होणार आहे तर दुसरीकडे सिंबा व त्याचे रिअल बाबादेखील पडद्यावर झळकणार आहेत. गणेश केंद्रे असे साईराजच्या वडिलांचे नाव असून ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अशातच त्यांची ही खास झलक सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील अधिपती लेकीला देतो अधिकाधिक वेळ, मुलगी दिसते फारच क्युट, नावही ठेवलं आहे अगदी युनिक

छोट्या सिंबाच्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. काही महिन्यांपूर्वी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या रीलमुळे साईराजला तुफान लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या निरागस अभिनयासाठी त्याचे खुप कौतुकही झाले. त्यानंतर त्याला ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत पाहुन सर्वांनाच खूप आनंद झाला.

आणखी वाचा – Video : सचिन पिळगावकरांच्या सासऱ्यांचा ८६व्या वर्षी भन्नाट डान्स, कुटुंबियांबरोबर जंगी सेलिब्रेशन, घरही आहे इतकं सुंदर

दरम्यान, अमोल भेटताच अर्जुन प्रचंड भावूक होतो. त्यामुळे आता अर्जुनला त्याचा लेक भेटल्यानंतर या मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार? अमोलला नेमकं कोणी किडनॅप केलं? या प्रकरणामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागांतून मिळतील.

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newssairaj kendre
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Aamir Khan got emotional in her daughter ira’s wedding video viral on social media

Video : शेवटी बापच तो! त्याक्षणी लेकीसाठी ढसाढसा रडला आमिर खान, म्हणालेला, "गेल्या वर्षांत ती माझ्यापेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.