कलाकारांच्या पडद्यावरील भूमिकेवर चाहते प्रेम करतात. ती पात्र कधी कलाकारांना त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटायला लागतात कळत ही नाहीत. अशीच सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली झी मराठीवरील मालिका अप्पी आमची कलेक्टर.छोट्या कुटुंबात मोठी स्वप्न असणाऱ्या अप्पीची ही कहाणी आहे. तिचा कलेक्टर होण्यासाठीचा प्रवास या मालिकेत दाखवला आहे.(Appi Aamchi collector)
पहा कोण आहे तो अभिनेता ? (Appi Aamchi collector)
या मालिकेचा नायक अर्जुन म्हणजेच अभिनेता रोहित परशुराम. त्याच्या नॅचरल अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अर्जुन ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे.अप्पीच्या कलेक्टर होणाच्या प्रवासात अर्जुनने तिची पुरेपूर साथ दिली आहे. अर्जुन सारखा साथीदार मिळावा असे प्रत्येक मुलीला वाटत असावे.सध्या मालिकेत अप्पी कल्लेक्टर झाली आहे. तिचा आता पर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसाठी रंजक ठरला.या पुढचा तिचा प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
भूमिकेप्रमाणे कलाकारांच्या खऱ्या आयुष्य बद्दल ही प्रेक्षक तितकेच उत्सुक असतात. अभिनेता रोहित परशुराम त्याच्या सोशल मीडिया वर ही तितकाच सक्रिय असतो.त्याची सेट वरची धमाल,त्याचे फोटोज, कुटुंबियांचे फोटो तो शेअर करत असतो.नुकताच एक फोटो शेअर करून रोहितने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. रोहितने त्याची पत्नी पूजा आव्हाड हिच्या सॊबतचा त्यांचा मॅटर्निटी शूटचा एक फोटो ‘Soon to be Mumma Dadda’ असे कॅप्शन देत शेअर केला आहे. तर लवकरच प्रेक्षकांचा लाडका अर्जुन त्याच्या खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे.(Appi Aamchi collector)
करिअर बरोबरच वैयक्तिक जीवन सांभाळणं ही कलाकारांसाठी तारेवरची कसरत असते, वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक निर्णय करिअर वर देखील तितकाच परिणाम करत असतो. आई-बाबा होणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप भावनिक क्षण असतो.तो प्रत्येक क्षण कलाकारांना अनुभवता येतोच असा नाही. पण हे सगळं सांभाळून कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणती कसूर सोडत नाहीत.
हे देखील वाचा : अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा