शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सकाळी आई गेल्याचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’बाबत बोलताना सुप्रिया पाठारे भावुक, म्हणाल्या, “११चा कॉलटाईम होता आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 18, 2023 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Supriya Pathare Emotional

"सकाळी आई गेल्याचं…", 'ठिपक्यांची रांगोळी'बाबत बोलताना सुप्रिया पाठारे भावुक, म्हणाल्या, "११चा कॉलटाईम होता आणि…"

मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. काही कालावधीसाठी सुरु असलेल्या मालिका एक ना एक दिवस प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशातच प्रेक्षकांची एक लाडकी मालिका निरोप घेत असल्याची बातमी समोर आली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर अवलंबून असलेल्या या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. (Supriya Pathare Emotional)

या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील आपापली पात्र उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटली. मालिका निरोप घेणार असल्याने मालिकेतील कलाकार भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – “इज्जत घालवली…”, ‘त्या’ डान्स व्हिडीओनंतर विशाखा सुभेदारला चाहत्यांनी सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, “यामध्ये काही…”

मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार असून त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आपले अनुभव सांगितले आहेत. हे अनुभव सांगतानाचा कलाकारांचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या मालिकेने दिलेलं प्रेम, मालिकेदरम्यानच्या प्रवासाबाबत बोलत कलाकार मंडळी या व्हिडिओमधून व्यक्त झाले आहेत. यावेळी सुप्रिया पाठारे यांनी मालिकेतील कलाकारांनी दिलेल्या आधाराबद्दल भाष्य केलं.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी मला जायचं होतं. तेव्हा मला ११चा कॉल टाईम देण्यात आला होता, आणि त्याच दिवशी सकाळी ८ वाजता माझी आई गेल्याचं कळलं. आणि त्यावेळेला वा त्यादिवशी शूटिंगला येणं शक्य नव्हतं. तेव्हा माझ्या या सर्व मुली शुटिंगसंपल्यानंतर माझ्याजवळ आल्या आणि मला त्यांनी मानसिक आधार दिला. दुसऱ्या दिवशी मी चित्रीकरणाला आले तेव्हाही सेटवर त्याबरोबरचं होत्या. मुलांवर प्रेम कायमचं असतं पण या मालिकेमुळे मुलांवर प्रेम करायचं अधिक वाढलं आहे. आता माझी बरीच मुलं आहेत. माझ्या घरची तसेच आता मालिकेतील ही सर्व मुलं एकत्र झाली आहेत. आणि मुलांच्या वाढत्या संख्येनुसार माझं त्यांच्यावरील प्रेमही जास्त वाढलं आहे”.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialstar pravahsupriya pathareSupriya Pathare Emotionalthipkyanchi rangolithipkyanchi rangoli off air
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
ankita lokhande inscure with husband Vicky jain popularity

Bigg Boss 17 : नवऱ्याला मिळत असलेली प्रसिद्धी अंकिता लोखंडेला सहन होईना, सलमान खानने खडसावल्यावर म्हणते, "कदाचित…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.