मराठी मालिका विश्वातील नवनवीन कथा आणि त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांच्या नेहमी पसंतीस पडत असतात. मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्टमुळेच टीआरपीच्या शर्यतीत मालिकांमध्ये नेहमीच स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेत सध्या अव्वल स्थानावर असलेली, नेहमीच चर्चेत असणारी आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवणारी ‘स्टार प्रवाह’वरील मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. मालिकेतील रंजक ट्विस्ट प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवत आहेत. या ट्विस्ट बरोबरच आता मालिकेच्या सेटवरही काही ट्विस्ट निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अभिनेत्री मीरा जगन्नाथने ही मालिका सोडल्यानंतर आता आणखी एका कलाकाराने ‘ठरलं तर मग’ला रामराम केला आहे. (Senior Actor Madhav Abhyankar Exit From The Tharla Tar Mag Serial)
‘ठरलं तर मग’ या मालिकेतील मीरा जगन्नाथ ही साक्षीची भूमिका साकारत होती. पण काही दिवसांपुर्वीच मीराने मालिका सोडली असून आता तिच्या जागी साक्षीच्या भूमिकेत केतकी पालव दिसणार आहे. मीराने मालिका का सोडली? याचं कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने ही मालिका सोडली आहे. साक्षीच्या वडिलांची भूमिका साकारणारे माधव अभ्यंकर यांनी ही मालिका सोडली आहे. माधव अभ्यंकर यांनी मालिका का सोडली? या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
साक्षीच्या वडिलांच्या भूमिकेत म्हणजेच ‘महिपत’ हे पात्र मयुर खांडगे साकरणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मयुरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता मयुर साकारत असलेलं महिपत हे पात्र प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडतं हे पाहणं रंजक ठरणार आहे. तसेच माधव अभ्यंकर यांनी ही मालिका सोडल्यानंतर पुढे आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.