शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला जेलमध्ये टाकतील कारण…”, पुण्यातील अपघात प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “पोलीस, न्यायव्यवस्थेबाबत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 24, 2024 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chetan Vadnere Angry Post

"मला जेलमध्ये टाकतील कारण…", पुण्यातील अपघात प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, "पोलीस, न्यायव्यवस्थेबाबत…"

सोशल मीडियावर सध्या पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेला कार अपघात चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोन तरुणांना धडक दिली. या दोन्ही तरुणांचा या धडकेत मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. यानंतर संपूर्ण जगभरातून याचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. (Chetan Vadnere Angry Post)

यानंतर त्या मुलाचा रॅप सॉंग गातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो मुलगा एक रॅप साँग म्हणताना आणि शिव्या देताना दिसतो आहे. यावरुन सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर आता या मुलाच्या आईने सदर व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा – Video : बायकोने दत्तू मोरेला गिफ्ट केली महागडी बाईक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

हा व्हिडीओ पाहून सामान्य जनतेसह आता कलाकार मंडळींनीही आवाज उठवला आहे. ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनेरे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हायरल व्हिडीओ स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. आणि या व्हिडीओसह कॅप्शन देत त्याने असं म्हटलं आहे की, “माहित नाही का, पण मला नाही वाटत याला कठोर शिक्षा होईल. खरंतर झाली पाहिजे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेबाबत मला काही बोलायचं नाही, नाहीतर याला सोडून मला जेलमध्ये टाकतील”.

आणखी वाचा – सायली-अर्जुनची साथ शेवटपर्यंत निभावणार, तर साक्षीसमोर येणार का चैतन्य-अर्जुनच्या मैत्रीचं सत्य?, नवं वळण

सोशल मीडियासह या प्रकरणावर संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आणि या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. सध्या हे प्रकरण चर्चेत आलेलं असून प्रत्येकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

Tags: Chetan VadnereChetan Vadnere Angry Postentertainmentmarathi actorPune porsche accident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Veteran actor Ashok Saraf and Rohini Hattangadi awarded by Lifetime Achievement Award.

अभिमानास्पद! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.