शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली-अर्जुनची साथ शेवटपर्यंत निभावणार, तर साक्षीसमोर येणार का चैतन्य-अर्जुनच्या मैत्रीचं सत्य?, नवं वळण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 24, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

सायली-अर्जुनची साथ शेवटपर्यंत निभावणार, तर साक्षीसमोर येणार का चैतन्य-अर्जुनच्या मैत्रीचं सत्य?, नवं वळण

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, अस्मिता आणि कल्पना सायलीला सकाळी तू कुठे गेलीस असं विचारतात तेव्हा सायली त्यांना कुसुम ताईला बरं नसल्याने तिथे तातडीने जावं लागलं असल्याचं सांगते. तर एकीकडे चैतन्य साक्षी आणि महीपतच्या विरोधात पुराव्यांसाठी महीपतच्या खोलीची झडती घेतो. तेव्हा त्याला कपाटात धारदार शस्त्र आणि बंदूक सापडते. चैतन्य साक्षीच्याही खोलीत झडती घेतो तेवढ्यात साक्षी तिथे येते. (Tharal Tar Mag Serial Update)

कालपर्यंत धडधाकट असलेल्या अर्जुनला अचानक इतका ताप भरल्याने प्रताप अस्वस्थ होतो आणि तो काळजी करु लागतो. त्यावर अश्विन सांगतो, दादांना कोणत्या तरी गोष्टीचा मेंटली स्ट्रेस घेतला आहे त्यामुळे त्याला ताप भरला असल्याचं प्रतापला सांगतो. घरातले सगळे खाली गेल्यावर सायली अर्जुनची माफी मागते आणि लवकर बरं व्हायला सांगते. दुसरीकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये प्रतिमासारख्या दिसणाऱ्या डेड बॉडीची व्यवस्था करायला हॉस्पिटलमध्ये येते. पण तिला तिथे बॉडीज बघून विचित्र वाटतं त्यामुळे तिथून ती निघून जाते.

आणखी वाचा – “एकमेकांना सांभाळून घेऊ आणि…”, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दत्तूने बायकोसह शेअर केले रोमँटिक फोटो, म्हणाला, “छान राहू…”

थोडा आराम केल्यानंतर अर्जुनला बरं वाटतं. अर्जुन मनात असं ठरवतो की, आता सायली पुन्हा घर सोडून गेली नाही पाहिजे. असा निश्चय तो मनाशी करतो. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला प्रपोज करायचं आहे असं सांगतो. यावर सायली त्याच्याकडे जरा गोंधळून बघते तेव्हा तोसुद्धा अडखळत एक आयडिया प्रपोज करायची आहे असं सांगतो. कॉन्ट्रॅक्ट संपत आलं असलं तरी आपण हे वाढवून घेऊ आणि मधुभाऊ सुटेपर्यंत घर सोडून जाऊ नका असंही अर्जुन सायलीला सांगतो. केस जिंकेपर्यंत इथेच राहून केसच्या शेवटच्या दिवसांत साथ देण्याचं वचनसुद्धा अर्जुन सायलीकडे मागतो. सायलीसुद्धा साथ द्यायला लगेच तयार होते.

आणखी वाचा – ‘बिग बॉस OTT’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा, सलमान खान नव्हे तर अनिल कपूर करणार सूत्रसंचालन?, व्हिडीओने वेधलं लक्ष

मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, साक्षी घरात नसताना चैतन्य अर्जुन व सायलीला साक्षी-महीपत विरोधात पुरावे शोधायला घरी बोलावतो. पुरावे शोधत असताना नेमकी साक्षी तिथे येऊन अर्जुन व सायलीला बघते.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Dattu More Wife Gift

Video : बायकोने दत्तू मोरेला गिफ्ट केली महागडी बाईक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, "बायको…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.