दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ द व्हॅक्सिन वॉर’ गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या संशोधकांच्या प्रवासावर आधारित या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, गिरीजा ओक, सप्तमी गौडा आदींनी प्रमुख भूमिका साकारली. एकीकडे चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रचंड कौतुक झाले. पण, जेव्हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तेव्हा अनेकांनी चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अशातच विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. (The Vaccine War director announcement)
रविवार व गांधी जयंतीनिमित्त प्रेक्षकांनी त्यांच्या कुटुंबासह चित्रपट पाहावा, यासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे एक तिकीट खरेदी केल्यावर एक तिकीट मोफत मिळणार असल्याची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “मित्रांनो, रविवार आणि सोमवार गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने तुम्ही तुमच्या कुटुंबासह ‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपट पाहायला जा आणि एक तिकीट मोफत मिळवा. हे तिकीट तुमच्या घरातील एखाद्या स्त्रीला द्या.”
हे देखील वाचा – Video: ‘तू चाल पुढं’ मालिकीतील वैरींचा ऑफस्कीन आहे ‘असा’ बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा व दीपा चौधरीचा व्हिडिओ चर्चेत
एकीकडे ‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपटाचे सोशल मीडियावर कौतुक होत असताना बॉक्स ऑफिसवर मात्र तो अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करू शकलेला नाही. सैकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने आतापर्यंत केवळ ५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवशी चित्रपट केवळ १.४५ कोटींची कमाई केली होती. मात्र आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते.
हे देखील वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
दरम्यान, या ऑफरचा फायदा झाल्याचे दिसले असून रविवारी चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली होती. आज हा चित्रपट किती कोटींची कमाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ देशभरातील चित्रपटगृहांत हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.