गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवानी नाईक व अमित रेखीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक व अंगठीच्या डिझाइनने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2025 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shivani naik amit rekhi engagement

शिवानी नाईक व अमित रेखीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक व अंगठीच्या डिझाइनने वेधलं लक्ष

shivani naik amit rekhi engagement : सध्या सिनेसृष्टीत एका मागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही कलाकार जोड्यांनी त्यांचा साखरपुडा सोहळा करत प्रेमाची कबुली दिली आहे. अशातच आता मालिका विश्वातील एका लोकप्रिय जोडीने साखरपुड्याच्याच दिवशी प्रेमाची कबुली दिली आहे. यापूर्वी या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली कोणत्याही माध्यमाद्वारे न देता थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली. त्यांनी थेट साखरपुडा समारंभातील दोघांचे फोटो एकत्र शेअर करत लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं चाहत्यांसह शेअर केलं आहे.

ही लोकप्रिय कलाकार जोडी म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अप्पी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक आणि ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील अभिनेता अमित रेखी. शिवानी आणि अमित लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत आणि त्यांच्या साखरपुडा समारंभाच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळालं. अखेर शिवानी आणि अमित यांचा एकमेकांना अंगठी घालत साखरपुडा समारंभ संपन्न झाला आहे. दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

आणखी वाचा – अप्पीच्या आयुष्यात खऱ्या अर्जुनची एंट्री, शिवानी-अमितचा साखरपुडा लूक समोर, Video व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

सोशल मीडियावर शिवानी आणि अमित यांच्या साखरपुड्याचे फोटो तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. शिवानी आणि अमित यांच्या साखरपुड्यातील खास लूकनेही साऱ्यांच्या नजरा वळवल्या. यावेळी अमित पारंपरिक अंदाजात दिसला तर शिवानी मॉडर्न टच असलेल्या पारंपरिक लूकमध्ये दिसली. दोघांच्याही खास लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. आजवर शिवानीने मालिकाविश्वातून बरीच लोकप्रियता मिळवली आहे.

आणखी वाचा – ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन, वयाच्या ७४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आता लवकरच लग्न बंधनात अडकण्यास सज्ज होणार आहे. शिवानी आणि अमित यांचे अचानक आलेले साखरपुड्याचे फोटो पाहून चाहतेही खुश असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.

Tags: appi amachi collectorshivani naikshivani naik amit rekhi engagement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
shivani naik amit rekhi engagement

ऑनस्क्रीन लेकाला आशीर्वाद द्यायला पोहोचल्या निवेदिता सराफ, अमित रेखी-शिवानी नाईकच्या साखरपुड्याला खास हजेरी, औक्षणही केलं…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.