मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखले जाते.
प्रवीण तरडे यांनी अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, त्यांचा मुळशी पार्टन हा सिनेमा विशेष गाजला होता. शिवसेनेचे निष्ठावंत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यवर आधारित “धर्मवीर” हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश उचलून ठरला. धर्मवीर सिनेमा नंतर प्रवीण यांचा सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची देखील तितकीच चर्चा रंगली होती. नुकताच प्रवीण तरडेंनी हंबीरराव चित्रपटाच्या संदर्भातला एक व्हिडियो फेसबुकवर शेअर केलाय.(Sarsenapati Hambirrao)
या व्हिडियोमध्ये एका लहान मुलीला सर्जा खानचा राग आल्याचं ती तिच्या आईला सांगताना दिसत आहे. लहानगीला तिच्या आईने विचारलं असता ती म्हणते सर्जा खानने हंबीरराव वर वार केलाय आणि त्याला कसं मारलं पाहिजे याची योजना करताना ती दिसत आहे. या व्हिडियोवर “मला नाही माहीत कोण आहे ही मुलगी पण आज खरच सरसेनापती हंबीरराव साठी ज्यांनी ज्यांनी कष्टं घेतले ते सार्थकी लागले मला या चिमुकलीला भेटायला आवडेल” असं प्रवीण तरडेंनी कॅप्शन दिले आहे. या व्हिडियोवर प्रवीण तारडेच्या चाहत्यांनी चिमुरडी साठी छान कमेंट्स देखील केल्या आहेत.
सिरसेनापती हंबीरराव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गश्मीर महाजन याने साकारली होती. तसेच “मेजवाणी परिपूर्ण किचन” या कार्यक्रमाचे सुञसंचालक तसेच शेफ विष्णू मनोहर यांनी या चित्रपटात दत्ताची मंत्री यांची भूमिका साकारली होती. यांच्यासोबतच या चित्रपटात मराठी अभिनेत्री श्रुती मराठे देखील आहे. सरसेनापती हंबीरराव या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांना मागे टाकत चित्रपटाचा ठसा बॉक्स ऑफिसवर उठवला होता. सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याने सगळ्या प्रेक्षकांनी सिनेमा गृहात एकच गर्दी केली होती.(Sarsenapati Hambirrao)
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यांच्या रक्षणार्थ आणि स्वराज्य राखण्यासाठी आपला प्राण पणाला लावणारे सरसेनापती हंबीरराव ताकदीने मुघलांसमोर उभे होते.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/03/दुनिया-डोक्यावर-घेणार-हाय-रं....-3-1024x546.jpg)